Jammu & Kashmir: NIA कडून आणखी दोन आरोपींना अटक; जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला

एनआयएने ने जम्मू-काश्मीरमधील काही विशिष्ट ठिकाणी छापेमारी केली आणि शनिवार इश्फाक अहमद वानी आणि उमर भट यांना अटक केली. एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपींना अटक केली आहे.

Jammu & Kashmir: NIA कडून आणखी दोन आरोपींना अटक; जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला
Jammu Kashmir security forces
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 7:56 PM

श्रीनगरः जम्मू आणि काश्मीर दहशतवादी कट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने  (National Investigation Agency) आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. एनआयएने ने जम्मू-काश्मीरमधील काही विशिष्ट ठिकाणी छापेमारी केली आणि शनिवार इश्फाक अहमद वानी आणि उमर भट यांना अटक केली. एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपींना अटक केली आहे. (NIA arrests two more terrorists in Jammu Kashmir raids)

दरम्यान, रविवारी सकाळी जम्मू-राजौरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रीय महामार्ग दोन आठवड्यांपासून बंद होता.

नऊ जवानांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठीचं ऑपरेशन सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्यात अकरा नागरिकांचीपण दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. एनआयएने या 10 ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या ऑपरेशन सुरू होऊन आज 21 दिवस झाले.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी प्रकरण लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम), हिज्बुल-मुजाहिदीन (एचएम), अल बद्र आणि त्यांच्या कॅडरद्वारे जम्मू-काश्मीर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या कटाशी संबंधित आहेत, असा आरोप आहे. रेझिस्टन्स फ्रंट (TRF), पीपल अगेन्स्ट फॅसिस्ट फोर्सेस (PAFF) इत्यादी सारखे दहशतवाद्यांचे सहयोगी असल्याचा आरोप आहे.

गुन्हा नोंदवल्यानंतर तीन दिवसांनी एनआयएने काश्मीर खोऱ्यातील 18 ठिकाणी शोध घेतला आणि नऊ दहशतवादी साथीदारांना अटक केली. 20 ऑक्टोबर रोजी 11 ठिकाणी छापे टाकले आणि आणखी चार जणांना अटक करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी 10 ठिकाणी छापे टाकले होते आणि त्यात आणखी आठ दहशतवादी पकडले गेले, तर 29 ऑक्टोबरला आणखी दोन जणांना अटक करण्यात आली.

Other News

दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांना सावरकर आणि सुषमा स्वराज यांची नावं दिली जाणार

Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश

NIA arrests two more terrorists in Jammu Kashmir raids

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.