‘गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना सन्यास देणार’, त्या आरोपांचा कदमांकडून जोरदार समाचार

रामदास कदम यांनी विजयासाठी 2009 ला अघोरी पूजा केली होती, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला होता, त्यानंतर आता कदम यांनी भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना सन्यास देणार, त्या आरोपांचा कदमांकडून जोरदार समाचार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2025 | 5:17 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 2009 साली कदम यांनी निवडणुकीत विजयासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर आता कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं, असं कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांनंतर कदम चांगेलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  भास्कर जाधव जे बोलले तेवढी त्यांची औकात नाही, एवढा मोठा माणूस तो नाही. 1995 आणि 2000 मध्ये मीच बाळासाहेबांना सांगून त्यांना तिकीट द्यायला सांगितलं होतं.  नौटंकी करण्यात भास्कर जाधव यांचा हात कोणी पकडू शकणार नाही, काळी विद्या करून तुम्ही आणि तुमचं कुटुंब दमलं, भास्कर जाधव हे खोटारडे आहेत.  एखाद्या व्यक्तीला बदनाम कसं करायचं हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावं असं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना कदम यांनी म्हटलं की, शिंदे सुरतला गेले, होते तेव्हा भास्कर जाधव हे पण सुरतपर्यंत आले होते, ते सुरतच्या बॉर्डरपर्यंत जावून आले. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तुम्ही येवू नका. भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे येऊन चूक केली असं ते म्हणतात. गुहागरची जनता आता भास्कर जाधव यांना संन्यास देणार आहे, ते फक्त  1200 मतांनी निवडून आलेले आहेत, असा घणाघात कदम यांनी जाधव यांच्यावर केला आहे. दरम्यान कदम यांच्या या आरोपांनंतर आता आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कदम यांना आता भास्कर जाधव हे काय उत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.