AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची नोटीस आली का? ‘मी मोदीभक्त’ म्हणणाऱ्या महेश कोठारेंना फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल

मोदींचा भक्त आहे म्हटल्यावर तुम्हाला ईडीची नोटीस तर आली नाही ना, असा सवाल भाजपच्या रमेश पाटील यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेंना केला आहे. या दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात कोठारे नेमकं काय म्हणाले, वाचा..

ईडीची नोटीस आली का? 'मी मोदीभक्त' म्हणणाऱ्या महेश कोठारेंना फोन; ऑडिओ क्लिप व्हायरल
Narendra Modi and Mahesh KothareImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 22, 2025 | 11:06 AM
Share

मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे.. असं वक्तव्य करून अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे चांगलेच चर्चेत आले आहेत. बोरिवलीत आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाट कार्यक्रमात कोठारेंनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. त्याचसोबत मुंबईत भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका राऊतांनी केली. त्यानंतर आता भाजप नेते रमेश पाटील आणि महेश कोठारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्हाला ईडीची नोटीस आली का, असा प्रश्न त्यांनी कोठारेंना विचारला आहे.

ऑडिओ क्लिपमधील महेश कोठारे आणि रमेश पाटील यांचा संवाद-

रमेश पाटील- आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. मी भाजपचा भक्त आहे, मोदींचा भक्त आहे, असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला या विषयावर ईडीची नोटीस तर आली नाही ना?

महेश कोठारे- नाही नाही (हसतात). माझं मत असू शकतं ना? माझं मत का नसू शकतं? ज्या मोदींनी या देशासाठी इतकं मोठा काम केलंय, इतकी वर्षे जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं नव्हतं, ते आता झालेलं आहे. त्याची कोणीतरी दखल घ्यायची नाही का? ज्या माणसाने आपलं सर्वस्व त्याच्यासाठी वाहिलंय. ते स्वत:साठी काही करत नाहीत, सर्व देशासाठी करत आहेत. त्यांचं कौतुक करण्यात काय चुकलं?

रमेश पाटील- तुम्ही काही भाजपविरोधात नाहीत?

महेश कोठारे- भाजपविरोधात काय, मी भाजप भक्त आहे. हे मी आज ठामपणे म्हणतो. मी मोदीजींचाही भक्त आहे.

रमेश पाटील- संजय राऊतांनी तुमच्या वक्तव्यावर म्हटलं की तुम्हाला तात्या विंचू रात्री येऊन चावेल.

महेश कोठारे- ते त्यांचं मत आहे. त्यात मी काय करू? त्यांचं मत त्यांनी मांडलं आणि माझं मत मी मांडलं. विषय संपला.

मी भाजपचा भक्त आहे, मी मोदींचा भक्त आहे.. याचा पुनरुच्चार कोठारेंनी या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. टीव्ही9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...