Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंनी दुष्काळावरून शरद पवारांचा इतिहास काढला, म्हणाले, ‘2-3 वेळा मुख्यमंत्री अन् कृषिमंत्री असताना कधी…’

रावसाहेब दानवे यांनी दुष्काळावरून शरद पवारांवर जळजळीत टीका केली आहे. कोरड्या दुष्काळावरून टीका करताना थेट शरद पवारांचा इतिहास काढला आहे,

Raosaheb Danve  : रावसाहेब दानवेंनी दुष्काळावरून शरद पवारांचा इतिहास काढला, म्हणाले, 2-3 वेळा मुख्यमंत्री अन् कृषिमंत्री असताना कधी...
raosaheb danve news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 8:30 AM

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना लवकर न मिळणाऱ्या मदतीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाचे रोहित पवार हे दुष्काळग्रस्त जिल्ह्याचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरड्या दुष्काळावरून शरद पवार यांनीही अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत. तसेच शरद पवार यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना सहाकार्य आणि सरकारी, प्रशासन दरबारी आवाज उचलण्यासाठी कानमंत्र दिला आहे. या सर्व घडामोडींवरून माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळावरून शरद पवारांवर टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘शरद पवारांनी पूर्व इतिहास तपासला पाहिजे. दोन-तीन वेळेस मुख्यमंत्री आणि देशाचे कृषिमंत्री होते. एक हेक्टरच्या वर तुम्ही पैसे देत नव्हते. अजूनही ज्या काही समस्या निर्माण होतील, त्याचा निराकरण करण्यासाठी आमच्या सरकार सज्ज आहे, यांनी चिंता करू नये’. ठाकरे बंधूच्या मोर्चावर दानवे म्हणाले, ‘आधी सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. त्या मोर्चात तरुण आले. मोर्चा काढला सीजेपीने आणि हे त्या मोर्चात गेले होते.  ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढण्याआधी एक पाहिलं पाहिजे की, कोणत्याही राजकीय पक्षाची परीक्षा मतदारामध्ये आणि निवडणुकीत होत असते. सगळ्या ठिकाणी यांचा दारुण पराभव झाल्याने यांचा जनाधार खसखलेला आहे. एखादा मुद्दा काढून गेलेला जनाधार मिळवता येतो का? यासाठी ही खटपट सुरू आहे’.

Loading...

विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर दानवे म्हणाले, ‘2024 सालच्या निवडणुकीनंतर आपण जर पाहत असाल, तर काँग्रेस पक्ष सतत कुठूनतरी मुद्दा काढून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतंय. निवडणुका संपल्या संपल्या त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज दिले की ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवायला पाहिजे होतं. मात्र कोणताही राजकीय पक्ष तिथे गेला नाही. त्यांचा कोर्टावर भरोसा नाही. ईव्हीएम वर भरोसा नाही, जनतेवर भरोसा नाही, ज्या घटनेने त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्या घटनेचा एक प्रकारे ते अपमान करतात. गेलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी जनतेमध्ये असा एखादा मुद्दा काढायचा, त्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us