रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना

| Updated on: Aug 08, 2022 | 8:37 AM

रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली

रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली,12 तासांपासून वाहतूक ठप्प, 15 दिवसातील तिसरी घटना
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. या घाटात दरड कोसळण्याची (Cracks Down) 15 दिवसातील तिसरी घटना समोर आली आहे. मलबा हटवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. तसंच वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रतत्न केले जात आहेत. रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. आताही अशीच दरड कोसळली आहे. रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. सर्वच नद्या दुथडी भरून वाहताहेत. काजळी नदी पात्रा बाहेर वाहतीये. हवामान खात्याने आजही दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस होतोय. अश्यात ही दरड कोसळली आहे.

रघुवीर घाटात दरड कोसळली

त्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. या घाटात दरड कोसळण्याची 15 दिवसातील तिसरी घटना समोर आली आहे. मलबा हटवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. तसंच वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रतत्न केले जात आहेत. दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. तिथेच दरड कोसळली आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

रत्नागिरीत धुवाधार!

रत्नागिरी-दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. सर्वच नद्या दुथडी भरून वाहताहेत. काजळी नदी पात्रा बाहेर वाहतीये. हवामान खात्याने आजही दिवसभर पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. रत्नागिरी राजापूर लांजा संगमेश्वरमध्येही जोरदार पाऊस होतोय. अश्यात ही दरड कोसळली आहे. सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील निळीक भुवडवाडीतही एका घरावर दरड कोसळली. या घटनेमुळे घराचं काही प्रमाणात नुकसान झालंय.

हे सुद्धा वाचा

ऑरेंज अलर्ट!

आजही मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई, ठाणे आणि पालघरला 5 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. मच्छिमारांनाही हवामान खात्याकडून इशाराही देण्यात आलाय. पुढचे दोन दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.