आंदोलने मिटवण्यासाठी फडणवीसांनी यावेळी निवडला नवीन मोहरा, संकटमोचक महाजनांऐवजी..

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर अकरा दिवसानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारने काही मोठे निर्णय घेतले. रोहित पवार विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते. सरकारने मंत्री शिवेंद्रराजे यांना चर्चेसाठी पाठवले होते.

आंदोलने मिटवण्यासाठी फडणवीसांनी यावेळी निवडला नवीन मोहरा, संकटमोचक महाजनांऐवजी..
Devendra Fadnavis and Girish Mahajan
| Updated on: Oct 12, 2026 | 11:05 AM

पुण्यात एमपीएससीच्या अध्यक्षांविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला. फक्त पाठिंबाच नाही तर रोहित पवार हे विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागीही झाले. विद्यार्थ्यांचे अकरा दिवस आंदोलन सुरू होते. एमपीएससी पेपरफुटीविरोधात हे आंदोलन होते. एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा विद्यार्थी मागत होते. ही त्यांची प्रमुख मागणी होती. पुण्यात गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने मध्यस्थ म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पाठवले. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. संवेदनशील आणि शांत स्वभाव म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

शिवेंद्रराजे यांना पाठवण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी होती. राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांमधील संवाद पूर्णपणे सकारात्मक मार्गाने व्हावा यासाठी एका जबाबदार आणि सर्वसमावेशक नेत्याची गरज होती. संवेदनशील विषयावर राजकारण न करता केवळ विद्यार्थ्यांचे हित पाहणे हाच सरकारचा मुख्य हेतू होता. थेट राज्य सरकारचा प्रस्ताव पोहोचवणे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तयार केलेला अधिकृत मसुदा व ठोस प्रस्ताव घेऊन शिवेंद्रराजे थेट आंदोलनस्थळी पोहोचले.

Loading...

आंदोलक यांच्याशी सकारात्मक वाटाघाटी करून तोडगा काढण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. आंदोलनात प्रमुख चेहऱ्यांमध्ये रोहित पवार, विश्वजीत कदम, विवेकानंद पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. शांत स्वभावाचे असलेले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी विद्यार्थी आंदोलनावर कुठलीही टोकाची टीका केलेली नव्हती.

याउलट पुण्यातील प्रमुख मंत्री असलेल्या चंद्रकांत दादा पाटील यांनी मात्र, रोहित पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्या छत्रपती करण्याची वंशज असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रति आदराची भावना आहे. याच कारणास्तव शांत, संयमी व आदर असलेला चेहरा म्हणून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना चर्चेला पाठविल्याची खात्रीलायक माहिती आहे. अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संकटमोचक मंत्री म्हणून अशाठिकाणी गिरीष महाजन यांना पाठवले जात होते,आता त्यांची जागा शिवेंद्रराजेंनी घेतल्याचे दिसतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us