
Relief package for Flood Affected Farmers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशात शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफीची घोषणा केली.30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर झाले आहे. पण गेल्यावर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याला महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यात राज्यातील जवळपास 20 हून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तुटपूंजी असल्याची ओरड झाली होती. तर या शेतकर्यांना कर्जमाफीची मदत मिळाली नसल्याची चर्चा होती. आता फडणवीस सरकारने ही नाराजी दूर केली आहे. राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा केल्याने शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला आहे. डणवीस सरकारकडून शेतकर्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या बदलाचा असा होईल फायदा…
नवीन नियमामुळे थेट मदत
नियमात केले हे महत्त्वाचे बदल
अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील
प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील
प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील
प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील
प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी १० हजार रूपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.
पूरग्रस्त शेतकर्यांना फडणवीस सरकारचा मदतीचा हात
पडझड व नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३ हजार रुपये मिळणार
मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७ हजार ५०० रुपये जाहीर
ओढकाम करणार्या जनावरांच्या मृत्यूसाठी ३२ हजार रुपये मिळणार
मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची घोषणा
प्रति शेळी व मेंढीसाठी ४ हजार रुपयांची मदत जाहीर
कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी १०० रुपये देणार