AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day 2024 : 26 जानेवारीला कोणते मंत्री कुठे ध्वजारोहण करणार? महत्त्वाची माहिती आली समोर

Republic Day 2024 राजधानी नवी दिल्लीत 'कर्तव्य पथ'वर भारताच्या राष्ट्रपतींसमोर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आयोजित केला जातो. या दिवशी, कर्तव्य पथवर औपचारिक परेड होतात, ज्याचे आयोजन संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होते, कर्तव्य पथ ओलांडून इंडिया गेटपर्यंत पोहोचते. राज्यात विविध ठिकाणी कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करणार आहे याची माहिती समोर आली आहे.

Republic Day 2024 :  26 जानेवारीला कोणते मंत्री कुठे ध्वजारोहण करणार? महत्त्वाची माहिती आली समोर
गणराज्य दिन Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 24, 2024 | 12:06 PM
Share

मुंबई : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2024) दिवशी ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाचवेळी पार पडणार आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी हा कार्यक्रम एकाचवेळी पार पडणार आहे. या मुख्य शासकिय समारंभात निमंत्रीतांना सहभागी होता यावे या दिवशी सकाळी 8.30 ते 10 वाजताच्या दरम्यान इतर कोणत्याही शआसकिय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्याच येऊ नये असे आवाहन परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. याशिवाय एखाद्या संस्थेला किंवा कार्यालयाला ध्वजारोहणाचा कार्यक्म करायचा असल्यास तो सकाळी 8.30 च्या आधी किंवा 10 वाजताच्यानंतर आयोजित करावा असंही नमुद करण्यात आले आहे. राज्यपाल सकाळी मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे प्रमुख कार्यालयात उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. याशिवाय कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करतील ते आपण जाणून घेऊया.

कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करतील?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात ध्वजारोहण करतील, अजित पवार पुणे, राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, दिलीपराव वळसे पाटील बुलढाणा, विजय कुमार गावित भंडारा, हसन मुश्रीफ कोल्हापूर, अब्दुल सत्तार हिंगोली, चंद्रकांत पाटील सोलापूर, गिरीश महाजन धुळे, सुरेश खाडे सांगली, तानाजी सावंत धाराशिव, उदय सामंत रत्नागिरी, दादाजी भूसे नाशिक, संजय राठोड यवतमाळ, गुलाबराव पाटील जळगाव, संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर, धनंजय मुंडे बीड, रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग, अतुल सावे जालना, शंभूराज देसाई सातारा, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर, धर्मराव बाबा आत्राम गोंदिया, संजय बनसोड लातूर, अनिल पाटील नंदूरबार, दिपक केसरकर ठाणे, आदिती तटकरे रायगड येथे ध्वजारोहण करणार आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये असा होणार ध्वजारोहण सोहळा

राजधानी नवी दिल्लीत ‘कर्तव्य पथ’वर भारताच्या राष्ट्रपतींसमोर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आयोजित केला जातो. या दिवशी, कर्तव्य पथवर औपचारिक परेड होतात, ज्याचे आयोजन संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होते, कर्तव्य पथ ओलांडून इंडिया गेटपर्यंत पोहोचते. परेड भारताची संरक्षण क्षमता, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवते. नौदल आणि वायुसेना व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या नऊ ते बारा वेगवेगळ्या रेजिमेंट्स त्यांच्या बॅंडसह त्यांच्या सर्व ट्रॅपिंग्ज आणि अधिकृत सजावटीसह मार्चपास्ट करतात. भारताचे राष्ट्रपती, जे भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ आहेत, सलामी घेतात. या परेडमध्ये भारतातील विविध निमलष्करी दल आणि पोलीस दलांच्या बारा तुकड्याही सहभागी होतात. प्रजासत्ताक दिनाच्या (प्रजासत्ताक दिन परेड) पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात.

प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 (10 आणि 11 जिओ 6C 30), युनायटेड किंगडमच्या संसदेचा एक कायदा, ब्रिटिश कॉमनवेल्थ दोन नवीन स्वतंत्र अधिराज्यांमध्ये विभागले गेले. मात्र, स्वातंत्र्यानंतरही देशाला कायमस्वरूपी राज्यघटना नव्हती. त्याचे कायदे सुधारित गव्हर्नमेंट ऑफ कॉलोनियल इंडिया ऍक्ट 1935 वर आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी कायमस्वरूपी राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ बी आर आंबेडकर होते. समितीने संविधानाचा मसुदा तयार केला, जो 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेला सादर करण्यात आला. विधानसभेने 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या 166 दिवसांच्या सार्वजनिक अधिवेशनात संविधानाचे वाचन केले. या सभेच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी दस्तऐवजाच्या दोन हस्तलिखित प्रतींवर (एक हिंदी आणि एक इंग्रजीत) विचारविनिमय आणि काही बदलांनंतर स्वाक्षरी केली. दोन दिवसांनंतर, म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात ही लिखित राज्यघटना लागू झाली. त्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संघाचे अध्यक्ष म्हणून पहिला कार्यकाळ सुरू केला. नवीन राज्यघटनेच्या तरतुदींनुसार, संविधान सभा ही भारताची संसद बनली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.