
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत लाखो लोकांना फटका बसला आहे.

पाऊस पाहता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 पथकं तैनात करण्यात आली आहेत.

गोव्यामध्येही एनडीआरएफच्या 5 एफ टीमनं कोल्हापुरातील 46 पुरुष, 35 महिला, 38 मुलं आणि 13 वृद्धांना रेस्क्यू केलं आहे.

पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची 8 पथकं ओडिशाहून पुण्यात दाखल झाली आहेत.

रायगडच्या तळीये गावात सर्वाधिक 40 मृत्यू झाले आहेत. याठिकाणी दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. 35 घरांवर ही दरड कोसळली होती.

एनडीआरएफच्या पथकानं सातारा येथील पाटणमध्ये 261 लोकांचा सुखरुप बचाव केला आहे. हे सर्व जण पूरग्रस्त गावात अडकले होते.