मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द, पालघर स्टेशनवर मात्र रिक्षा धावली

पालघर रेल्वे स्थानकावर एका वृद्धाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा प्लॅटफॉर्मवर नेण्यात आली होती.

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द, पालघर स्टेशनवर मात्र रिक्षा धावली

पालघर : मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत, मात्र पालघर रेल्वे स्टेशनवर (Palghar Railway Station) चक्क रिक्षा (Rickshaw) धावताना पाहायला मिळाली. वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षाच थेट प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली.

पालघरमधील मासवण भागात घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी गेलेलं कुटुंब मुंबईतील घरी परत येत होतं. त्यावेळी कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. बघता बघता त्यांची प्रकृती खालावली.

रेल्वे स्थानकावर असलेल्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. मात्र 15 मिनिटं उलटून गेल्यानंतरही डॉक्टर आले नाहीत, मात्र एका नर्सने येऊन वृद्धाला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. मात्र वृद्धाची तब्येत ढासळत होती. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फलाटावरील चिकू विक्रेता जयवंत चौहान यांनी रिक्षा थेट फलाटावर आणली.

वृद्धाला रिक्षातून पुढील उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु स्टेशनवर आलेल्या रिक्षाची चर्चा प्रवाशांमध्ये पाहायला मिळाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *