‘एकजरी पुरावा दिला तरी तात्काळ…,’ पेपर फुटी प्रकरणावर MPSCअध्यक्षांचे सर्वात मोठे विधान, नेमके काय म्हणाले ?

पेपरफुटीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीकडून उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर त्यांनी उत्तर दिले आहे.

एकजरी पुरावा दिला तरी तात्काळ..., पेपर फुटी प्रकरणावर MPSCअध्यक्षांचे सर्वात मोठे विधान, नेमके काय म्हणाले ?
MPSC Chairman Vivek Bhimanwar
| Updated on: Sep 07, 2026 | 8:29 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएसी पेपर फुटी प्रकरणात पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन करुन एमपीएसीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या ऐवजी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा अशी मागणी केली आहे. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्यावतीने रोहित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. आता यावर विवेक भीमनवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित झाल्याचे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे.

विवेक भीमनवार म्हणाले की “माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणसुद्धा मी या पदावर राहणार नाही असे म्हटले आहे. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम मी सेवेत रुजू होण्यापूर्वीचा आहे.या प्रकरणात माझ्याकडे तक्रार प्राप्त होताच आयोगाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित…

स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा अशा एकूण 84 परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. निकाल जाहीर होण्यातील विलंब कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे. भविष्यात एका महिन्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याचे विवेक भीमनवार यांनी केली आहे. एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हाच उद्देश असल्याचे विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us