चौकशी समितीकडून 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपची मागणी, जरांगेंच्या मनात वेगळीच भीती, फडणवीस, शिंदेंकडे थेट मोठी मागणी

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

चौकशी समितीकडून 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपची मागणी, जरांगेंच्या मनात वेगळीच भीती, फडणवीस, शिंदेंकडे थेट मोठी मागणी
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 04, 2026 | 3:00 PM

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली ज्या ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फात देण्यात आले, अशी चर्चा या ऑडिओ क्लिपमध्ये होती. मनोज जरांगे पाटील यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवताच मोठी खळबळ उडाली. चर्चेला उधाण आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा खुलासा करावा अशी मागणी त्याऐवळी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या ऑडिओल क्लिपवरून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान भाजपमधील काही नेत्यांकडून हे ऑडिओ क्लिप एआयची निर्मित असल्याचा दावा देखील करण्यात आला. तसेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण कोणाकडून पैसे घेतले देखील नाही, आणि कोणाला दिले देखील नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑडिओ क्लिपची तपासणी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले होते.  दरम्यान या चौकशी समितीने आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला  आहे.

Loading...

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी समीतीने जरांगे यांना पत्र देवून, ऑडीओ क्लिपची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, चौकशी समिती जे-जे मागेल ते आम्ही त्यांना देऊ, तपास यंत्रणनेला ती ऑडिओ क्लिप देण्याची आमची तयारी आहे. ऑडिओ क्लिपचा सोर्सही सांगू, परंतु  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ऑडिओ क्लिप देणाऱ्याच्या जीवाला धोका होणार नाही, याची शाश्वती पत्रकार बांधवांसमोर द्यावी, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us