अजितदादांच्या निधानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कोण त्रास देतंय? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने थेट नावचं सांगितलं

सुनील तटकरे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तटकरेंच्या विधानावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तटकरे यांच्यावरच गंभीर आरोप केला.

अजितदादांच्या निधानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कोण त्रास देतंय? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने थेट नावचं सांगितलं
rupali thombare
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 1:08 PM

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काल खासदार सुनील तटकरे यांनी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीची कल्पना दिली होती, असे सांगितले. अजितदादांच्या निधनानंतर तब्बल 9 महिन्यांनी सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तटकरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुनील तटकरे यांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी थेट तटकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ,जय पवार यांना सुनील तटकरे हे त्रास देत असल्याचा गंभीर आरोपच ठोंबरे पाटील यांनी केला. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुनील तटकरे यांच्या विधानावर भाष्य करताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, ‘विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. तर अजितदादा यांचं अकाली निधन झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्या चर्चा का फेटाळल्या? अजितदादा यांचे निधन झाल्यानंतर दोन्ही पक्ष तातडीने एकत्र येत होते. मात्र सुनील तटकरे यांनी सांगितलं की अशी कोणतीही चर्चा झाली नाही. वास्तविक पाहता शरद पवार आणि अजित पवार त्यांची चर्चा झाली होती. मला स्वतःला अजित पवार यांनी सांगितलं होतं की, आपण दोन्ही पक्ष एकत्रित करत आहोत. नऊ महिन्यानंतर तटकरे साहेबांना अशी कोणती उपरती झाली. एकत्र आलो पाहिजे, या मताचे आम्ही पण आहोत’.

Loading...

‘अजितदादांच्या निधनानंतर त्यांना केंद्रीय पदाची शाश्वती नव्हती. त्यांना वाटलं होतं की, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांना आपण आपल्या तालावरती नाचवू. शेवटी सुनेत्रा पवार या पवारांच्या सून आहेत.  भाजप बरोबर बोलून मंत्रिपदासाठी या सर्व गोष्टी होत आहेत का? झारीतले शुक्राचार्यांनी जाणीवपूर्वक अजितदादांनाही त्रास दिला. सुनेत्रा वहिनींनाही त्रास देतात. पार्थदादांनाही त्रास देतात. जय पवार यांना हे त्रास देतात. या लोकांचा भंडाफोड होणं गरजेच आहे. झारीतले शुक्राचार्य हे सुनील तटकरे आहेत, असे त्या म्हणाल्या. शरद पवारांच्या भेटीबाबत ठोंबरे पाटील म्हणाल्या, सुनेत्रा पवार वहिनींना वेळेची काय गरज आहे, ते त्यांचे सासरे आहेत. शरद पवार हे भीष्मपिता आहेत’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us