AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत…सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!

अगोदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून gpay वरून दर्शनासाठी पैसे घेतले जात होते. हे सर्व लक्षात आल्यावर मी 19 कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं. त्यांच्याकडून नंतर शपथपत्र घेतलं, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.

खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत...सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!
raj thackeray and sada sarvankar Shree Siddhivinayak TempleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 3:43 PM
Share

Siddhivinayak Trust : राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत गैरसमजाने काही माहिती दिली. सिद्धिविनायक न्यासाच्या आमच्या काही ट्रस्टींनी सरकारला एक पत्र दिले होते. या पत्रात देणगीची चौकशी करा, अशी विनंती केली होती. या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमजाची भावना निर्माण झाली. सिद्धिविनायक न्यास गेली दोन वर्षे उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.

एक पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. या पत्रात मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला जातोय, असं नमूद असल्याचा आरोप मनसेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याबाबत तुमचे मत काय आहे? असे सदा सरवणकर यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना, संबंधित पत्रात चोरी असा कुठेही उल्लेख नाही. पूर्वी सिद्धिविनायक न्यासाची दानपेटी होती, त्यात दरवर्षी 40 ते 45 लाख रुपये होती. गेल्या महिन्याभरात हे दान 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत दान वाढले आहे. मंदिरा परिसरात ज्या उपायोजना केल्या आहेत, त्यामुळे हे दान वाढले आहे, असे स्पष्टीकरण दिले.

9 कर्मचाऱ्यांना पकडलं भटजींना…

अगोदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून gpay वरून दर्शनासाठी पैसे घेतले जात होते. हे सर्व लक्षात आल्यावर मी 19 कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं. त्यांच्याकडून नंतर शपथपत्र घेतलं. काही ठिकाणी कर्मचारी हातचलाखी करून पैसे काढतात. हे कळलं तेव्हा आम्ही कारवाई केली. 9 कर्मचाऱ्यांना पकडलं. भटजींना काही जण पैसे देतात पण आपल्याला असलेल्या GR प्रमाणे भटजींना जर कोणी पैसे दिले तर ते दानपेटीत टाकावं लागतं. हे सगळं लक्षात आलं आणि उत्पन्नाची झाली, असेही सदा सरवणकर यांनी पुढे सविस्तर सांगितलं.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती