Sayaji Shinde : काय पैसे खायचे ते खा, कोणती प्रगती करायची, ती करा, पण..वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांचे काळजाला भिडणारे शब्द
अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाच्या संरक्षाणासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. सह्याद्री म्हणजे केवळ डोंगररांग नाही, तर महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा, आपली जीवनदायिनी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य आहे.... असं म्हणत शिंदे यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

टोरंट जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपुरात देखील आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी ‘सह्याद्री बचाव आंदोलना’ची हाक दिली आणि सर्वांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं. सह्याद्री म्हणजे केवळ डोंगररांग नाही, तर महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा, आपली जीवनदायिनी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य आहे… असं म्हणत माध्यमांशी संवाद साधताना सयाजी शिंदे यांनी काळजाळा भिडणारं वक्तव्य केलं आगे.
सयाजी शिंदे म्हणाले, ‘100 – 200 वर्षांची झाडं तोडत आहे, त्यामुळे आपण सर्व सामान्य लोकांनी एकत्र येऊन वीज कमी वापरु, वीजेची गरज कमी करुया. आता दिवसाव 50 लाईट लावून ठेवतो, दिवसा लाईट वापरण्याची देखील पद्धत आणली. रिसॉर्टमध्ये 100 लाईट्स असतात आणि फक्त एकच बुकींग असते. 5 स्टार हॉटेलमध्ये तर लाईट्स चालूच असतात. आता प्रत्येक माणसाने जागृत व्हायला पाहिजे. विनाकारण पाणी वाया घालवू नका… शासनाला देखील जागृत करुत… सर्वांनी एकत्र मिळून पर्यावरनाचं संरक्षण करुया.
सरकारवर निशाणा साधत शिंदे पुढे म्हणाले, ‘झाडाला आणि पर्यावरला त्रास न देता, काय पैसे खायचे ते खा, काय करायचं आहे ते करा, कोणती प्रगती करायची, ती करा… त्याचा मला काहीही फरक पडत नाही. मला असं वाटतं आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, त्यामुळे यासर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. हा सर्व मनाचा खेळ आहे, की किती विकास करायचा आहे करा, शेवटी 500 वर्ष जगणार नाही तुम्ही, ज्या दिवशी ऑक्सिजन घेता येणार नाही, तेव्हा धन्यवाद कार्यक्रम आहे तुमचा. त्यामुळे आपण जागृत राहूया आणि पर्यावरणाला जपूया…मी सर्वांना विनंती करतो, या आंदोलनात सहभाही व्हा. आपला सह्यात्री वाचवा… ‘
पुढे सयाजी शिंदे म्हणाले, ‘आईनंतर जर कोणी आपल्याला जगवणार आहेत तर ते झाड आहे. त्यामुळे याच्या राजकारण विकास असं काहीही नाही. पर्यावरणाचं संरक्षण सर्वांची जबाबदारी आहे. आपण एवढं डोकं लावलं पाहिजे की, याला कोणी त्रास देणार नाही. एवढं शाहणपण आपण दाखवला पाहिजे.’, सध्या सर्वत्र सयाजी शिंदे यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.