...तर साई संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त होणार

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या नियुक्तीवर राज्य सरकारच्या न्याय आणि विधी विभागामार्फत त्रयस्थ समितीचे गठण करण्यात आल असून, विश्वस्त नियुक्ति संदर्भात ही समिती साई संस्थानचे किती सदस्य पात्र आणि किती अपात्र या संदर्भात आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती …

...तर साई संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त होणार

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांच्या नियुक्तीवर राज्य सरकारच्या न्याय आणि विधी विभागामार्फत त्रयस्थ समितीचे गठण करण्यात आल असून, विश्वस्त नियुक्ति संदर्भात ही समिती साई संस्थानचे किती सदस्य पात्र आणि किती अपात्र या संदर्भात आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती गठीत करण्यात आली असून सुनिल पोरवाल,  मनिषा म्हैसकर आणि रूबल अग्रवाल या समीतीचे सदस्य असणार आहेत.

बातमीतले महत्त्वाचे मुद्दे :

  • साई संस्थानवर त्रयस्थ समितीची नेमणूक
  • विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्यासह विश्वस्त निवडीवर आक्षेप
  • दोषी आढळल्यास विश्वस्तपद होणार रद्द
  • समिती करणार विश्वस्तांचे पुनर्निरीक्षण
  • पुर्ननिरीक्षण होवून होणार विश्वस्तांची नेमणूक

सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारला साई संस्थान विश्वस्त नियुक्ती संदर्भात दीड महिन्यात पुनर्निरीक्षण आणि पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुशंघाने राज्य सरकारे त्रयस्थ समिती गठीत केली. साई संस्थान विश्वस्त मंडळातील किती सदस्य पात्र ठरणार आणि किती अपात्र, हे या समितीच्या अंतिम अहवाल सादर केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या विश्वस्तपदाचा सचिन तांबे तसेच प्रताप भोसले यांनी अगोदरच राजीनामा दिला आहे. तर शिवसेनेचे तीन विश्वस्त नियुक्तीनंतर एकाही बैठकीला हजर नाहीत. विद्यमान अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यासह सर्वच विश्वस्त निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता. सध्या एकूण 10 विश्वस्त मंडळात आहेत.

आता त्रयस्थ समिती विश्वस्तांचे पुनर्निरीक्षण करणार आहे. यात दोषी आढळल्यास विश्वस्तपद रद्द होणार असल्याने आता विद्यमान विश्वस्तांपैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्री साईबाबा संस्थान विद्यमान विश्वस्त मंडळ :

भाजप

१. डॉ. सुरेश हावरे , अध्यक्ष

२. चंद्रशेखर कदम , उपाध्यक्ष

३. भाऊसाहेब वाकचौरे , सदस्य

४. अॅड. मोहन जयकर , सदस्य

५. बिपिन कोल्हे , सदस्य

६. डॉ. राजेंद्र सिंह , सदस्य

शिवसेना

७. मनीषा कायंदे , सदस्य

८. रविंद्र मिर्लेकर , सदस्य

९.अमोल किर्तीकर , सदस्य

 

१०. योगिता शेळके (पदसिद्ध सदस्य)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *