शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध, मुख्यमंत्र्यांना भेटणार

| Updated on: Jan 12, 2022 | 11:50 AM

संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध, मुख्यमंत्र्यांना भेटणार
SHIVAJI MAHARAJ
Follow us on

बुलडाणा : संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केला आहे. अरबी समुद्राऐवजी स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेवर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिजाऊ जन्मोत्सवाच्या (Jijau Birth Anniversary) पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

…तर गावागावात जाऊन निधीउभारणीचे काम करु 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्यदिव्य स्मारक होणार आहे. या स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. मात्र त्याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनाच्या जागेवर उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच स्मारक बनवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभरात मोहीम राबवली जाणार आहे. 19 फेब्रुवारीच्या आधी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची भूमिका मांडणार आहेत. राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड गावागावात जाऊन निधी उभारणीचे काम करणार आहे. तशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

यावर्षी जिजाऊ जन्मोत्सव साध्या पद्धताने

दरम्यान, दरवर्षी 12 जानेवारी रोजी उत्साहाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. 424 व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. यावेळी आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले. यावेळी शासकीय पूजाही संपन्न झाली आहे. पूजनवेळी अनेक जिजाऊ भक्त उपस्थित होते. पूजनादरम्यान जय जिजाऊ जय जिजाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. कोरोनामुळे यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय. मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे.

इतर बातम्या :

अखेर…सिद्धार्थ दोन पाऊले मागे! सायना नेहवालवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्यांने मागितली माफी, वाचा काय होते संपूर्ण प्रकरण…

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 14 लाखांहून अधिक रुग्ण, फ्रान्स- स्वीडनमध्येही हाहाःकार

25 वर्षांपूर्वी देशात डुकारचे हृदय माणसाच्या शरीरात धडकले अन् डॉक्टरला इनाम म्हणून खावी लागली तुरुंगाची हवा