AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये घुसून मारू… दोघे ताब्यात, जरांगेंना भेटण्यापूर्वीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन; मोठी खळबळ

Prasad Lad receives threatening call: भाजप आमदार प्रसाद लाड हे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीत दाखल होतील. ते छत्रपती संभाजीनगरहून निघाले आहे. पण त्यापूर्वी त्यांना हॉटेलमध्ये घसून मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना दोन ते तीन वेळा धमकीचा फोन आला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

हॉटेलमध्ये घुसून मारू... दोघे ताब्यात, जरांगेंना भेटण्यापूर्वीच प्रसाद लाड यांना धमकीचा फोन; मोठी खळबळ
भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 22, 2026 | 10:14 AM
Share

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही9 प्रतिनिधी, छत्रपती संभाजी नगर : भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये दोघांनी फोनवरून धमकी दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रसाद लाड रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी आहेत. त्यावेळी त्यांना धमकीचे दोन ते तीन कॉल आले. हॉटेलमध्ये घुसून मारू अशी धमकी त्यांना देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि दोन तरुणांना अटक केली. आज सकाळीच प्रसाद लाडे हे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. ते थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करतील. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू केल्याचे मानले जात आहे.

हॉटेलमध्ये घुसून हल्ला करतो

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असताना काल रात्री प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली. हॉटेलमध्ये घुसून मारण्याची धमकी देण्यात आली. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करतो गाडीवर हल्ला करतो अशा प्रकारची धमकी दोघांनी दिली. आंदोलन सुरू असताना तुम्ही मनोज जरांगे पाटलांवर टीका करत होते आता कशी भेट घेताय असं म्हणत ही धमकी देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून योगेश शितोळे पाटील व गणेश उगले यांना ताब्यात घेत अटक केली. या दोघांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

शंकाचं निरसन करणार

या संपूर्ण घटनाक्रमावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. उदय सामंत यांचं जरांगेंशी चांगलं असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सरकारची कोणती भूमिका असेल तर अशावेळी उदय सामंत जातात. त्यांच्या भेटीत काही झालं नाही असा माझा अजिबात आरोप नाही, असे ते म्हणाले. तर धमकी प्रकरणावरही त्यांनी मनमोकळं केले. धमकी देणार्‍या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. माझ्याबाबतीत त्यांना काही शंका, त्यांच्या शंकांचं निरसन करु. पोलिसांना त्या तरुणांविरोधात कडक कारवाई न करण्याचे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मनोज जरांगेंच्या भेटीला त्यांच्या विनंतीनंतर आलो असल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ