Sanjay Shirsat : निदा खानप्रकरणात तोच मुख्य आरोपी… इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल होताच संजय शिरसाट यांचा तो मोठा गौप्यस्फोट

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel: नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याने माजी खासदार इम्तियाज जलील अडचणीत आले आहे. एमआयएम नेत्यावर गुन्हा दाखल झाल्यावर पालकमंत्री आणि शिंदे सेना नेते संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat : निदा खानप्रकरणात तोच मुख्य आरोपी... इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल होताच संजय शिरसाट यांचा तो मोठा गौप्यस्फोट
निदा खानप्रकरणात तोच मुख्य आरोपी... जलील यांच्यावर शिरसाटांचा मोठा आरोप
| Updated on: Nov 06, 2026 | 10:25 AM

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel: नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात एआयएमआयएमला मोठा धक्का बसला. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएम नेत्यावर गुन्हा दाखल झाल्यावर पालकमंत्री आणि शिंदे सेना नेते संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याप्रकरणी जलील यांना तुरूंगात जावे लागेल असे मोठे वक्तव्य केले आहे.

प्रकरणात जलीलच मुख्य आरोपी

Loading...

निदा खान हिला नाशिकमधून पळवणे, तिला मुंब्र्यात घेऊन जाणे, तिथून तिला छत्रपती संभाजीनगर येथे आणणे आणि जवळपास 35 दिवस ज्याने मदत केली, तो मुख्य आरोपी, मी आजही तुम्हाला सांगतो की मुख्य आरोपी हे इम्तियाज जलील हेच आहे. मतीन पटेल हा तर केवळ मोहरा होता. इम्तियाज जलील यांनी हे कारस्थान केलेले आहे. म्हणून आज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना तुरुंगात जावे लागेल ही परिस्थिती आहे, असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.

धर्मांतरणासाठी टोळ्या कार्यरत

धर्मांतरणासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही भाग आहे. तिथे या टोळ्या कार्यरत आहेत. सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. पोलीसही त्यादृष्टीने तपास करत आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. हा एका दिवसात दाखल गुन्हा नाही. त्यांचे व्हाईस मॅसेज, कॉल सॅम्पल जुळले आहेत. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ दिवस ती निदा खान इथं राहत होती. तिची आई, मावशी आणि एकूण पाच दिवस इथं राहत होते. त्यांच्याशी इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार संवाद व्हायचा. म्हणून व्हाईस सॅम्पल, आवाजाचा नुमना जुळला. पोलिसांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला, त्यांचे मी अभिनंदन करतो, असे शिरसाट म्हणाले. तर याप्रकरणात जलील यांना तुरुंगात जावे लागेल, असा दावाही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us