शाळकरी मुलांना ‘खान’ अन् पुष्पा’ हिरो वाटतात, पण…; IRS समीर वानखेडेंकडून खंत, मनातलं बोलून गेले

शाळकरी मुलांना 'खान' अन् पुष्पा' हिरो वाटतात, पण त्यांना तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे माहीत नसल्याची खंत समीर वानखेडे यांनी व्यक्त केली.

शाळकरी मुलांना खान अन् पुष्पा हिरो वाटतात, पण...; IRS समीर वानखेडेंकडून खंत, मनातलं बोलून गेले
sameer wankhede
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 9:57 AM

माजी एनजीबी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी शाळकरी मुलांवर मोठं भाष्य केलं आहे. आजकालच्या शाळकरी मुलांना ‘खान’ आणि ‘पुष्पा’ हिरो वाटतात. पण त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच नाव देखील ऐकलं नाही, असं वक्तव्य आयआरएस समीर वानखेडे यांनी केलं. एका कार्यक्रमात तरुणांशी बोलताना खत बोलून दाखवली. यावेळी मंचावर मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.

समीर वानखेडे यांनी मनसेने आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअरसाठी चांगला सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी आतापासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करा, असा सल्ला वानखेडे यांनी दिला. ‘इन्स्टाग्रामपेक्षा सामान्य ज्ञानावर भर द्यावा. अभ्यास करावात, वर्तमानपत्र वाचा, असेही त्यांनी सांगितले.

समीर वानखेडे काय म्हणाले?

‘मला कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी फोन आला. त्यावेळी ऑन ड्युटी होतो. परंतु मुलांचा कार्यक्रम असून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायला या, अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी कधीच सोडत नाही. भारताच्या लोकसंख्येत युवकांचा महत्त्वाचा वाटा आहे. माझ्याही पेक्षा तुम्ही एक्सपर्ट असून तुमच्याकडे यूपीएससीचे पर्याय आहेत. त्याचबरोबर एमपीएससीचाही पर्याय आहे. सोशल मीडियापेक्षा सामान्य ज्ञानावर भर द्यावा. दररोज चांगला अभ्यास करावा. पेपर वाचावा. त्याचबरोबर बॅकअप प्लान देखील ठेवा.

‘महाराष्ट्रातील मुलांची यूपीएससीमध्ये टक्केवारी कमी आहे. त्याच्या उलट यूपी, बिहार, राजस्थानची टक्केवारी अधिक दिसून येते. महाराष्ट्राचे, मराठी अधिकारी झाले पाहिजे. मी मराठी असूनही आंध्र प्रदेश, चेन्नईत कार्यरत आहे, असे समीर वानखेडे यांनी सांगितले.

शाळकरी मुलांवर वानखेडेंचं मोठं विधान 

‘आपली नवीन पिढी चुकत असल्याचे वाटतेय. छोट्या मुलांना हिरो कोण विचारल्यावर त्यांनी एका खानाचं नाव घेतलं. दोन-तीन जणांनी पुष्पाचे नाव घेतलं. खरंतर शिक्षकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभु देशपांडे यांची नावे कधीच ऐकली का? मी त्यांना हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे सांगितले, असे वानखेडे पुढे म्हणाले.

Follow Us