डॉक्टर तरुणीच्या छळाचा आरोप असलेल्या आरोपी पीएसआय गोपाळ बदने याची थेट पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला…

Phaltan Doctor Death case : पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची थेट नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहित गंभीर खुलासे केले. आता गोपाळ बदनेलाही पोलिसांनी अटक केली.

डॉक्टर तरुणीच्या छळाचा आरोप असलेल्या आरोपी पीएसआय गोपाळ बदने याची थेट पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, मला...
PSI Gopal Badne
| Updated on: Oct 26, 2025 | 7:24 AM

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी तळहातावर गंभीर आरोप लिहून आत्महत्या केली. संपदा मुंडे यांनी एका पीएसआयसोबतच पोलिस कर्मचाऱ्यावर आरोप केली. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली. पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची थेट नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहित गंभीर खुलासे केले. प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे संपदा मुंडे हिने पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला. संपदा यांच्या आत्महत्येनंतर पीएसआय बदने फरार होता. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली.

पीएसआय बदने स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने याला मेडिकलसाठी रात्री उशिरा नेण्यात आले. आरोपी पीएसआय बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. पीएसआय गोपाल बदने याची एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी बदने याच्याविरोधात सुसाईड नोट लिहित आरोप केले. या घटनेनंतर आरोपी गोपाल बदने हा फरार झाला होता. अखेर 26 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःहून पोलिसात हजर झाला. आज बदने याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय बदने यानी यादरम्यान आपली प्रतिक्रिया दिली.

पीएसआय गोपाळ बदने याने म्हटले की, मला निष्कारण अडकवले जातेय… त्याचबरोबर गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेरासमोर बदने याने हातही जोडले. सुरवातीला आरोपी बदने हा फलटण ग्रामीण पोलिसांना शरण आला. त्यानंतर आरोपी बदने याला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आले. फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये 1 तास चौकशी केल्यानंतर बदनेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मेडिकलला नेत असताना बदने याने प्रतिक्रिया दिली.