AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर 106 आमदार असूनही घरी बसले असते; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचा भाजपला सणसणीत टोला, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Sanjay Gaikwad Statement: प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपला कडक शब्दांत सुनावले आहे.

...तर 106 आमदार असूनही घरी बसले असते; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचा भाजपला सणसणीत टोला, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
| Updated on: Oct 24, 2026 | 5:54 PM
Share

सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमधील धुसपूस आता चव्हाट्यावर आली आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. आता या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रवीण दरेकरांवर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आरे आणि कारेची भाषा ही मुळात शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांना वेगळे करण्याचे हे षडयंत्र दिसत आहे. कुठेतरी सांगायचं की भाजपमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदे आणि उठाव केला नसता तर भाजपचे 106 आमदार असूनही ते घरी बसले असते. ज्या 236 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या त्या फक्त एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केला म्हणून त्या निवडून आल्या आहेत, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून सखोल चौकशी केली पाहिजे. शिवसेनेचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. ही बाळासाहेबांच्या विचारांची संघटना आहे. आरोप करताना आधी विचार केला पाहिजे आणि वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं आहे. संजय गायकवाडांनी हर्षवर्धन सपकाळांनाही उत्तर दिले आहे. त्यांच्यावर बोलताना गायकवाड म्हणाले की, कशाच्या भरोशावर तुम्ही अटक करणार आहे. हे फक्त कटकारस्थान आहे, की उपमुख्यमंत्री बदनाम कसे झाले पाहिजे. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या दिवाळखोरीचे लक्षण दिसते आहे.

ते म्हणाले की, रामदास कदम काय चुकीचे बोलले? रामदास कदम यांनी जर आरोप केले तर तुम्हाला काय म्हणायची गरज आहे? त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुमच्या पक्षाचे आमदार तुमचे कार्यकर्ते यांचा आवाज स्पष्टपणे दिसतो आहे. यावर तुम्ही स्पष्टीकरण करा की तुम्ही का बोलताय, आधी तुम्ही आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडल्या की, शिवसेनेच्या मंत्र्याला मारहाण झाली, कारवाई झाली नाही. शिवसेनेच्या आमदारावर गुन्हे दाखल झाले हे महाराष्ट्र पाहत नाही का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे सुसंस्कृत संयमी, शांत आहे. ते उत्तर देणार नाही पण आम्ही मात्र याला उत्तर देऊ. मनोज जरांगे यांनी जे मोर्चे काढले आणि जे दहा टक्के आरक्षण दिलं ते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे आणि दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देईन. यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे हे मला माहित नाही. रामदास कदम हाडाचे शिवसैनिक आहे. त्यांनी शिवसेना पक्ष वाढवला आहे, असं संजय गायकवाडांनी ठणकावून सांगितलं आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...