AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटच्या सामन्यातून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रभक्तीचे ढोंग उघड, हिंमत असेल तर देशात किंवा…संजय राऊतांची जोरदार टीका

संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. मला आर्श्चय या गोष्टीचे वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला आणि तुम्ही त्यांच्याकडे मते मागत आहात.

क्रिकेटच्या सामन्यातून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रभक्तीचे ढोंग उघड, हिंमत असेल तर देशात किंवा...संजय राऊतांची जोरदार टीका
Sanjay Raut
| Updated on: Aug 22, 2025 | 11:03 AM
Share

संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंच्या शिवसेनेने सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिलेला आहे. आम्ही हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. मला आर्श्चय या गोष्टीचे वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला. आमदार खासदार  50-50 कोटींना विकत घेतले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागत आहात. हे फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात अशी मते मागितली जात आहेत.

तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागत आहात? आणि तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मते फुटतील? डुबप्लिकेट जी शिवसेना आहे, त्यांचीही मते फुटतील असे तुम्हाला वाटते का? कारण वातावरण तसे आहे. ही उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक इतकी सहज नाहीये. दोन्ही बाजूंनी. आज मोदींकडे कागदावर बहुमत आहे. यासोबतच त्यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी जी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो.

राजनाथ सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीच्या अगोदर शिष्टाचार म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असेल आणि यादरम्यान येणाऱ्या फोनला आम्ही शिष्टाचाराच्या नजेरेने बघतो. अशा निवडणुकांमध्ये या चर्चा होत असतात. रेड्डी आंध्र प्रदेशचे उमेदवार असल्याने तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये अस्वस्थता आहे. प्रतिभा पाटलांना आम्ही मराठी म्हणून पाठिंबा त्यावेळी दिला होता. तोच प्रकार होऊ नये आणि मते फुटली जाण्याची शक्यता असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे.

ते महाराष्ट्राचे मतदार आहे तर त्यांनी धोतर नेसून जायला हवे होते ना…मग ते लुंगी नेसून का गेले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला ती चाणक्यगिरी शिकू नये, राज्यपाल हा राज्यात असतो त्यावेळी तो त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो. आम्हालाही घटना माहिती आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक घटनेचे पालक करतो. फडणवीस आम्हाला काय सांगतात त्यांचे मूळ हे तामिळनाडू आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रभक्तीचे ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडे पडले आहे. हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उधळून लावले असते. हिंमत असेल तर महाराष्ट्र किंवा देशात हे सामने घ्या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो. तुमच्या दम नाही तुम्ही पळवाटा शोधता. कारण तुमचे पैसे त्यामध्ये गुंतलेले आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा