…तर संसदेत डिलिमिटेशन बिल आणण्याचं भाजपचं धाडसच झालं नसतं, संजय राऊत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?

केंद्रातील भाजप सरकारने तीस नोव्हेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर केलं जाण्याची शक्यता आहे. यावरून आता संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर संसदेत डिलिमिटेशन बिल आणण्याचं भाजपचं धाडसच झालं नसतं, संजय राऊत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांचा डिलिमिटेशन बिलावरून हल्लाबोल
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 11:51 AM

केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. लोकसभेचं अधिवेश हे 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तर राज्यसभेचं अधिवेशन 2  डिसेंबर ते 3 डिसेंबर असं दोन दिवसांचं असणार आहे. याच अधिवेशनामध्ये सरकार डिलिमिटेशन बिल सादर करण्याची शक्यता आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत, शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते, असं राऊत यांनी म्हटलं आहे, त्यांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

Loading...

‘आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते: डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे. जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील! म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे. “इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो; गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे डिलिमिटेशन बिलाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देखील अलर्ट मोडमध्ये आल्यांच पहायला मिळत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये बोलावलं आहे. सर्व खासदारांची एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us