Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट PM मोदींकडे मागणी

अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी थेट PM मोदींकडे केली आहे. संजय राऊतांच्या मागणीने चर्चांना उधाण आलं आहे.

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट PM मोदींकडे मागणी
sanjay raut news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 10:58 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. इंडिया आघाडीकडून काल रामलीला मैदानावरून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसहित निवडणूक आयोगावर तोफ डागली. तर निवडणूक आयोगाने कोट्यवधी नावे मतदारयादीत हटवल्याची माहिती आहे. हटवण्यात आलेली नावे घुसखोर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.

संजय राऊत म्हणाले, ‘1974 साली जयप्रकाश नारायण यांनी लोकशाही बचावचा नारा दिला होता. जाणकारांच्या मतानुसार, त्या रॅलीपेक्षा कालची रॅली मोठी होती. संविधान रक्षण, संविधानिक संस्थांच्या रक्षणासाठी जयप्रकाश नारायण यांनी आवाहन केलं होतं. तेच आवाहन काल राहुल गांधी यांनी केलं. आपण पाहिलं असेल की, भाजपची नजर कमजोर आहे. त्यांना जळवचं आणि लांबचं दिसत नाही. त्यांना डोळे बदलावे लागतील. आम्ही रामलीला मैदान डोळ्यांनी पाहिलं. खरंतर अमित शहांकडून रामलीला मैदानात येणाऱ्या अनेकांना अडवून ठेवण्यात आलं होतं. कालची रॅली यशस्वी झाली. ज्ञानेश्वर कुमार यांना जावं लागेल, हा यशस्वी संदेश जनतेमध्ये गेला’.

Loading...

अमित शहा यांनी राहुल गांधी कधीच पंतप्रधान होणार नाही, अशी टीका केली. त्यावर संजय राऊत म्हणाले, ते स्वत:विषयी बोलत आहेत. त्यांचा राग काढत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं की नाही, हे जनता ठरवेल. हे अमित शहा ठरवणार नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणले, हे जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. हे हलवता येणार नाही. आमचा तिथेच आक्षेप आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही. तर ज्ञानेश कुमारांच्या मेहरबानीने निवडून आले. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करत आहोत. अमित शहा हे हटवण्यात आलेल्या 13 कोटी मतदारांना बांगलादेशी म्हणत आहेत. पण बांगलादेशची लोकसंख्या 15 कोटी आहे. त्यातील साडेतेरा कोटी इथे कसे आले. जर ते आले असतील, ते हे अमित शहा यांचे अपयश आहे. त्यामुळे तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी केली पाहिजे. कारण भारतात साडेतेरा कोटी घुसखोर कसे राहतात, हे सांगावे. अमित शहा काय करत आहेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us