Sanjay Raut | त्यांना खाजवण्याची सवयच आहे, एक दिवस चामडी फाटणार.. संजय राऊतांनी काय दिला इशारा?

| Updated on: Apr 26, 2022 | 10:36 AM

हनुमान चालिसा म्हटल्याने कुणावर गुम्हा दाखल नाही. ते वकील आहेत. त्यांनी कोर्टाचं जजमेंट वाचावं. तुमचं मन अशांत असेल तर तुमच्या घरात किंवा मंदिरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात वाचू नका, असा सल्ला राऊत यांनी दिला.

Sanjay Raut | त्यांना खाजवण्याची सवयच आहे, एक दिवस चामडी फाटणार.. संजय राऊतांनी काय दिला इशारा?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबईः भोंग्यावरून बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची गरजच नव्हती. तो पूर्णपणे गृहखात्याचा विषय होता. पण काही लोकांना खासजवण्याची सवयच आहे. ते सतत खाजवत असतात. पण मी सांगतो, त्यांनी फार खाजवत बसू नये. एक दिवस त्यांची चमडी फाटणार आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) यांनी काल झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. ज्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाहीत, त्या ठिकाणी आम्ही जाऊन काय करायचंय, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना आज संजय राऊत यांनी चांगलंच सुनावलं.

काय म्हणाले संजय राऊत?

देवेंद्र फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची गरज नव्हती. तो गृहखात्याचा विषय होता. विरोधी पक्षाला काहीना काही खाजवण्याची सवय आहे. सतत खाजवत असतात. त्यामुळे त्यांची चामडी फाटणार आहे. त्यांचे बुरखेच फाटणार आहेत. त्यांनी फार खाजवत बसू नये. कायदा सुव्यवस्थे संदर्भात सरकार काही निर्णय घेत असेल तर बैठकीत सहभागी व्हावं. आदर्श विरोधी पक्ष असल्याचं दाखवून द्यावं. तुमचीच मागणी होती ना मग बहिष्कार कसा टाकता. त्यांना अराजकता निर्माण करायची आहे. गोंधळ करायचा आहे. त्यालाच राजद्रोह म्हणतात. उत्तर प्रदेशात अशा लोकांवर भाजपच्या सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. विरोधी पक्ष घंटा वाजवत बसले आहेत. त्यांनी वाजवत बसावं..’

फडणवीसांच्या हनुमान चालिसावर…

देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत हनुमान चालिसावरून महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्न विचारले. आपल्या देशात हनुमान चालिसा म्हणायची नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? हनुमान चालीसा वाचल्यानंतर राजद्रोहाचे आरोप होत असतील तर आम्ही रोज म्हणू… आमच्यावरही राजद्रोह लावा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ फडणवीस दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसा म्हटल्याने कुणावर गुम्हा दाखल नाही. ते वकील आहेत. त्यांनी कोर्टाचं जजमेंट वाचावं. तुमचं मन अशांत असेल तर तुमच्या घरात किंवा मंदिरात वाचा. दुसऱ्यांच्या घरात वाचू नका, असा सल्ला राऊत यांनी दिला.

इतर बातम्या-

Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीसांना लोकशाहीची उबळ, त्यांची भावना समजू शकतो; संजय राऊत यांचा टोला

1 मेच्या Raj Thackeray यांच्या सभेआधीच Aurangabad मध्ये जमावबंदी लागू