मोदींच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाकरे सरकार असमर्थ? राऊत म्हणाले, एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का?

| Updated on: Feb 08, 2022 | 10:36 AM

महागाईला जागतिक परिस्थिती जबाबदार असते, मात्र कोणत्याही सरकारला महागाईच्या खाईत मरताना पाहता येईल का? राज्यासाठी, राष्ट्रासाठी चांगली पाऊलं उचलली असतील तर त्या गोष्टी आम्ही घेऊ. भाजपशी आमचं काय नळावरचं भांडण आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मोदींच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाकरे सरकार असमर्थ? राऊत म्हणाले, एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का?
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल केलेल्या भाषणामुळे उठणारी राजकीय आरोपांची राळ निवडणुकीच्या तोंडावर वाढलीय. मात्र, दुसरीकडे भाजपवर आपल्या शेलक्या शब्दांत प्रहार करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता मात्र, एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, म्हणत भाजपने पुढे येऊन बोलावे असे आवाहन केले आहे. राऊत यांनी आज दिल्ली येथे माध्यमांधी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांचं भाषण मी ऐकलं, वाचलं. भाषण मोदी यांच होतं, पण त्यांनी महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलं म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खुलासा व्हावा. मला हे ऐकून वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय. त्याचं महाराष्ट्र खापर फोडणं योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नची वाहवा केली. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा सरकार, डॉक्टर, नर्स यांचा अपमान आहे. आता भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. आम्ही एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते?

संजय राऊत म्हणाले की, सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते? राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? कौतुक कुणी केलं, असा सवालही त्यांनी केला. मी यूपी, कानपूर, वाराणसी दौरा करणार आहे. मात्र, गोव्यात जातोय हे सांगायलाही ते विसरले नाहीत. यावेळी त्यांनी सोमय्यांनाही प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्यांच्या आरोपांचं पोलीस पाहतील. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे जावं. त्यांनी जो बायडन यांना भेटावं, आंतरराष्ट्रीय न्यायलयात जावं. कायद्याचं राज्य आहे, कोणावरही खुनी हल्ला झाला असेल तर कायदा काम करतो. न्यायालयांचे मालक आम्ही नाही, न्यायालयांचे मालक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले. शिवाय नारायण राणे, चंद्रकांत दादा बोलले, त्याची दखल दिल्लीत घ्यायची गरज नाही. गोव्यात जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, गडकरी ते करू शकतात, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

चांगल्या गोष्टींचे स्वागत

महागाईला जागतिक परिस्थिती जबाबदार असते, मात्र कोणत्याही सरकारला महागाईच्या खाईत मरताना पाहता येईल का?, असं देखील संजय राऊत म्हणाले. निवडणुका आहेत, जाहीरनामा प्रसिद्ध होत असेल, त्यात चांगल्या गोष्टी असतील तर त्याचं आम्ही स्वागत करू. राज्यासाठी, राष्ट्रासाठी चांगली पाऊलं उचलली असतील तर त्या गोष्टी आम्ही घेऊ, असं संजय राऊत म्हणाले. भाजपशी आमचं काय नळावरचं भांडण आहे का, असा सवालही त्यांनी केला.

इतर बातम्याः

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग कोर्ट निर्णय देणार?

TV9 Final Opinion Poll: उत्तर प्रदेशात दलित, सवर्ण, तरुण आणि महिला कुणाच्या बाजूने?; यूपीचा पोल काय सांगतो?