Sanjay Raut : INS विक्रांतच्या गुन्हेगारांना राज्यपाल कसे भेटतात? सोमय्यांच्या भेटीवरून राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावरूनही आता संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत. विक्रांतचे गुन्हेगारांना राज्यपाल कसे भेटू शकतात? असा थेट सवाल आता संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut : INS विक्रांतच्या गुन्हेगारांना राज्यपाल कसे भेटतात? सोमय्यांच्या भेटीवरून राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
संजय राऊतांचा राज्यपालांना सोमय्यांच्या भेटीवरून सवाल
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 4:55 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुरू झालेलं राजकीय युद्ध अजूनही संपलेलं नाही. तसेच आयएनएस विक्रांत (Ins Vikrant Case) कथित गैरव्यवहार प्रकणावरूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावरूनही आता संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत. विक्रांतचे गुन्हेगारांना राज्यपाल कसे भेटू शकतात? असा थेट सवाल आता संजय राऊतांनी केला आहे. तसेच मी फक्त आर्थिक कनेक्शन बाबत बोललो. कोण कोणाबरोबर जेवायला बसलं, फोटो काढतं यावर बोललो नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांनी गोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत करत आहेत.

राज्यपाल गुन्हेगारांना कसे भेटतात?

यावर बोलताना राऊत म्हणाले, भाजप हवेत गोळीबार करत आहे, ते त्यांना करू द्या. मात्र आर्थिक व्यवहार झाल्याची चौकशी व्हायला हवी की नको? असा सवाल राऊतांनी केला आहे. भाजप ने मुद्यावर बोलावे. त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपती यांना भेटावे. मात्र गुन्हेगार यांना राज्यपाल कसे भेटतात? विक्रांतच्या गुन्हेगारांना राज्यपाल कसे भेटू शकतात? असा सवाल राऊतांनी केला आहे. तसेच विक्रांतचे पैसे राजभवनला दिले असे किरीट सोमय्या म्हणाले होते? त्याचे काय झालं. या राज्यात गुन्हेगारांना संरक्षण राजभवन देते का? हा प्रश्न उभा राहत आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. तर दिल्लीत का तक्रार केली? महाराष्ट्रात पोलीस नाहीत का? येथे तक्रार करायची ना, दिल्लीत तक्रार केली यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते, असा टोलाही राऊतांनी लगावाल आहे.

नवनीत राणा यांच्यावरही गंभीर आरोप

मंगळवारीच संजय राऊतांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लखडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आणि लखडावाला हा डी गँगशी संबंधीत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यावरून आता इतर नेत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर संजय राऊतांनीही राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार आणि केंद्रीय तापस यंत्रणांना टोलेबाजी केली आहे.