Udayanraje Bhosale: माझं नाव घेतलं ना तर XX XXX काढेल, उदयनराजेंचा शिव्याशाप देत संताप; म्हणाले, माझ्या हातात ईडी द्या

Udayanraje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांचं मत विचारण्यात आलं.

Udayanraje Bhosale: माझं नाव घेतलं ना तर XX XXX काढेल, उदयनराजेंचा शिव्याशाप देत संताप; म्हणाले, माझ्या हातात ईडी द्या
उदयनराजेंचा शिव्याशाप देत संताप; म्हणाले, माझ्या हातात ईडी द्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 4:18 PM

सातारा: राज्यातील परिस्थितीवर टीका करताना भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची जीभ घसरली. उदयनराजे यांनी मीडियाशी बोलताना राजकारण्यांना नाव न घेता थेट शिव्या घातल्या. इशारेही दिले. एवढेच नव्हे तर माझा आवडता कार्यक्रम टॉम अँड जेरी (tom and jerry) बघणं आहे. आता मी ते सुद्धा पाहायचं बंद केलंय. कारण रोजच्या माकडउड्या पाहायला मिळत आहेत, असं सांगतानाच माझ्या हातात ईडी द्या. सर्वांना सरळ करतो, असा दमच उदयनराजेंनी भरला. बरं एवढ्यावरच थांबतील तर ते उदयनराजे कसले? उदयनराजेंच्या टीकेतून ईडीही (ED) सुटली नाही. ईडी म्हणजे चेष्टा झालीय. पान टपरीवरील बिडीसारखी ईडीची अवस्था झालीय, असे फटकारेही उदयनराजे यांनी लगावले. उदयनराजे यांच्या या बिनधास्त आणि परखड विधानांची सध्या साताऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

खासदार उदयनराजे भोसले मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांचं मत विचारण्यात आलं. त्यानंतर उदयनराजेंनी थेट राजकारण्यांवरच आसूड ओढायला सुरुवात केली. वातावरण बिघडलेलं आहे… बिघडवलं कोणी याचा विचार केला पाहिजे. माझं आवडतं चॅनल म्हणजे टॉम अँड जेरी आहे. मी सध्या ते बघायचं बंद केलंय. या ज्या माकडउड्या चालल्यात ना, त्या बघत बसतो. मजा येते. कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला आत टाकतंय, सगळं काही बेसलेस आहे. कोण म्हणतंय मुख्यमंत्री आहे.. कोण म्हणतोय तो आहे… कोण म्हणतोय हा आहे… का? चांगलं आहे. काय बोलणार, असं ते उदयनराजे म्हणाले.

माझ्या हातात द्या ईडी मग दाखवतो

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेवरही टीका केली. कोल्हापूरला उत्कृष्ट अशी सभा झाली. लोकं भरपूर आले. वादच नाही. पण लोकांना काय दिलं? भाषणातून काय सांगितलं? झिरो. काहीच नाही. या लोकांनी पैसे खाल्लेच आहे. माझ्या हातात द्या ईडी मग दाखवतो या सर्वांना, असा इशाराच त्यांनी दिला.

बिडी तशी ईडीची अवस्था

सारखं सांगून सांगून ईडी म्हणजे ना चेष्टा झालीय आहे. पान टपरीवर बिडी मिळते ना बिडी तशी ईडीची अवस्था झालीय. ईडी आली… ईडी आली. द्या ना ताब्यात. लावा चौकशी. चाप लावा एकाला. सर्व सरळ होतील. काढा सणकून, असंही ते म्हणाले.

कुणाच्या नादी लागत नाही, पण

एका बाजूला फुटपाथवर लोकं झोपत आहेत. हे त्यांना दिसत नाही? हे प्रत्येक जण एकमेकांची पाठ थोपटत असतात. जेलमध्ये नाही तो… त्याने काय केलं नाही… पण दीड वर्ष दोन वर्ष आत होता… त्याने पण काही केलं नाही, तो आता जेलमध्ये आहे… कशाला असं? लोकांना काय डोळे नाहीत? लोकांना काय मेंदू नाही? लोकं हसत आहेत. काय बोलणार? असा उद्वेग त्यांनी केला. निवडणुका लागल्या तर कसे उभे राहणार त्यांचं त्यांनाच माहीत. एकमेकांवर आळीपाळीने xxx आता. मी मागेही सांगितलं होतं, लोक भडकलेलं आहेत. मी कुणाच्या नादी लागत नाही. माझं नाव घेतलं ना xx xxx काढेल. आलं का लक्षात, असा इशाराही त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.