
“प्रचार संपलेला आहे काल. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करु शकता. तो ही घराघरात जाऊन. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो ही आधीची पंरपरा होती. अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका त्यांनी काल घेतली. प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करु शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरु आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून पैशाचं वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“त्यांना मुभा मिळावी यासाठी आधीचा नियम मोडून नवीन तिळगुळे दिलाय का? अशी मतदारांच्या मनात शंका आहे. ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदडल जातय. आज दिवसभरात हे बदडण्याच नाट्य जास्त प्रमाणात घडू शकतं. हिंदू-मुस्लिम आणि पैशाच वाटप याशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत. यांना कोणता विचार नाही. फक्त पैशाच वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याच कोणतीही मोठी ताकद दिसत नाही. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी सांगितलय कार्यकर्त्यांना दिसेल तिथे ठोका, तरच मुंबई वाचेल, महाराष्ट्र वाचेल. लोकशाही वाचेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची संस्था ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल” असं संजय राऊत म्हणाले.
हा पैसा येतो कुठून?
“लक्ष्मी दर्शन त्यासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना दान दिलेला आहे. पैसे कोणाकडे आहेत, पैसा शिंदे गटाकडे, भाजपकडे, अजित पवारांकडे आहे. हा पैसा येतो कुठून? हे काल अजित पवारांनी सांगितलं. कशा फायली शेकडोकोटीच्या मंजुरीसाठी आल्या. मग हे सगळ्याच्या बाबतीत आहे शिंद्याच्या बाबतीत अजित पवाराच्या, देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या इतर सहकाऱ्याच्या बाबतीतही आहे” असं संजय राऊत म्हणाले.
कोड्यात बोलू नका
“निवडणूक आयोग , ACB काय करतय ते काही करणार नाहीत. अजित पवार सांगतात माझ्याकडे एक फाईल आली, तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. कोड्यात बोलू नका. हिम्मत असेल तर समोर येऊन सांगा. गणेश नाईक यांना आव्हान आहे की कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असा म्हणताय. मग कोणत्या कारणासाठी जातील?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
याला ब्लॅकमेलिंग म्हणतात
“एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे, ते पैसा वाटतायत असं फडणवीस सरकारमधील मंत्री गणेश नाईक सांगतात. मग तुम्ही उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. हे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय ते चुकीच आहे. अजित पवार, गणेश नाईक यांच्याकडे महाराष्ट्राच्या हिताची काही माहिती असेल, तर त्यांनी ती लोकांसमोर उघड केली पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.