Sanjay Raut : कोणाच्या घरी जाऊन…5 तारखेच्या मेळाव्याबद्दल राऊत काय म्हणाले?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची अजून निवड झालेली नाही, त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं. "आरएसएस आणि भाजप भाऊ-भाऊ आहेत. आतमध्ये दोन भावांमध्ये काय चाललय माहित नाही. आरएसएसने मनात आणलं, तर ते भाजपला धडा शिकवू शकतात" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : कोणाच्या घरी जाऊन...5 तारखेच्या मेळाव्याबद्दल राऊत काय म्हणाले?
sanjay raut
| Updated on: Jul 02, 2025 | 10:55 AM

“पाकिस्तानला इतकं महत्त्व, ताकद कधी मिळाली नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणाला यूएनमध्ये महत्त्व मिळायचं. पाकिस्तान टेरिरिस्ट देश आहे हे आपण सांगण्यात यशस्वी ठरलो. पाकिस्तान दहशतवादाचा पालनकर्ता आहे हे पटवून दिलं. पण मोदी आल्यापासून, जयशंकर आले, अमित शाह तेव्हापासून आपण हे सिद्ध करु शकलेलो नाही” असं दावा संजय राऊत यांनी केला. “संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला महत्त्वाच पद मिळालं. पाकिस्तानी आर्मी चीफला व्हाइट हाऊसमध्ये पार्टीला बोलावलं. अनेक राष्ट्र पाकिस्तानसोबत ऑपरेशन सिंदूरनतंर उभी राहिली. अजूनपर्यंत भारताचं परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय त्यावर एक शब्द बोलत नाहीय. मोदींनी ट्रम्प यांना विचारलं पाहिजे, भारतासोबत हे काय चाललय? ही खूप गंभीर बाब आहे. नरेंद्र मोदी परदेशात फिरतायत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “पाकिस्तानला ताकद देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे, ते भारतासाठी धोकादायक आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात कधी असतात? ते परदेशात असतात. त्यांच्याकडे टूर अँड ट्रॅव्हल मिनिस्ट्री असली पाहिजे. मन की बातमध्ये त्यांनी सांगितलं पाहिजे, कुठल्या देशात जायचं, कुठल्या देशात रहायचं. महाराष्ट्रात तीन महिन्यात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पहलगामचे चार दहशतवादी सापडत नाहीयत आणि मोदी परदेशात फिरतायत” असं संजय राऊत म्हणाले.

मेळाव्याच कोणा-कोणाला निमंत्रण ?

5 जुलैला होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याबद्दल संजय राऊत म्हणाले की, “पाच तारखेच्या मेळाव्यासाठी फार कमी दिवस राहिले आहेत. आज बुधवार, शनिवारी मेळावा आहे. आज शिवसेनेचे अनिल परब आणि मनसेचे नेते वरळीच्या डोन सभागृहात जाऊन पाहणी करत आहेत” “या मेळाव्याच कोणाला घरी जाऊन आमंत्रण देणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सर्वांना एकत्रित सहभागी होण्याच आवाहन केलय. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तो मराठी एकजुटीचा विजय आहे” असं संजय राऊत म्हणाले.

जे उपस्थित राहतील, त्यांचं स्वागत

“हा राजकीय मेळावा नाही. मनसे प्रमुख आणि उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं झालं. हा राजकीय मेळावा, मानपमान विषय इथे येत नाही. आम्ही सगळ्यांना इथे आमंत्रित केलय. जे उपस्थित राहतील, त्यांचं स्वागत केलं जाईल. कोणाच्या घरी जाऊन निमंत्रण देणार नाही. वेळ कमी असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तीशहा आमंत्रण देणं शक्य नाही” असं संजय राऊत म्हणाले.

ते एकत्र येणार ही तुमच्या मनातली भिती

“ठाकरे एकच आहेत. तुम्ही त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ते एकत्र येणार ही तुमच्या मनातली भिती आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकरेंना आणावी लागत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.

‘हा धंदा तुमचेच लोक करत आहेत’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख केला. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकणारी मुलं, हिंदी आमची भाषा आहे. त्याचा पुरस्कार करतो, विदेशी भाषेचा पुरस्कार करत नाही असं म्हणाले. त्यावर राऊत उत्तर देताना म्हणाले की, “पंतप्रधान सांगा या देशातल्या सर्व इंटरनॅशनल स्कूल बंद करुन टाका. आरएसएसची मागणी आहेच. जीआर काढा. जीआर काढण्याची हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक जीआर काढा. महाराष्ट्रात इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत. हा धंदा तुमचेच लोक करत आहेत, तो बंद करु टाका”