महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू, संजय राऊत यांचा मोठा आरोप..
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका नुकताच सरकारवर केली. राज्यात शिक्षणाचा कसा खेळखंडोबा झाला, यावर बोलताना संजय राऊत दिसले. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी टीका नुकताच सरकावर केली. संजय राऊत यांनी म्हटले की, सरकारला शिक्षण व्यवस्थेबद्दल गांभीय नाहीये. पेपरफुटीच्या मुद्द्यात आपण कडक कायदा आणला, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. टास्क फोर्स आपण स्थापन केले. त्याच्यावर चर्चा संसदेत सुरू आहे. बदनामी कोणाची करत आहेत, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांची. पण काल त्यांना प्रियंका गांधींनी उत्तम उत्तर दिले. आज देशाचे लक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाकडे लागून राहिलेले आहे. राहुल गांधी आज बोलतील. मला असे वाटते की, काल संसदेत काही जे उद्योग करत होते, त्यांना आज चांगले उत्तर दिले जाईल. नीटचे पेपरफुटीचे प्रकरण सुरू असताना राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पेपरफुटी सुरू आहे. एमपीएससी असेल आैषध निरीक्षक असतील त्याच्या अगोदर टीईटीचे पेपर फुटले.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, त्यामध्येच आज पुण्यात बोगस पदवीचा घोटाळा पुढे आला. महाराष्ट्रात 200 शाळा बंद पडलेल्या आहेत. संस्थाचालकांना नवीन शाळांसाठी प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रूपये द्यावे लागतात. जंतर मंतरला आंदोलन झाले की, शिव्या घाला. आम्ही काही टीका केली की, येढे वाकडे बोला. अहो तुम्ही काय करत आहात.
महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत जो पूर्ण रसातळाला गेला त्याबाबतीत त्याला जबाबदारी देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात. केंद्रामध्ये मोदी आणि शाह आहेत. तुम्ही मुद्द्याचे बोला. मग आमच्यावर टीका करा. आमचे कामच आहे, तुम्हाला आरसा दाखवण्याचे. कशापद्धतीने महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पैशांचा खेळ सुरू आहे. काय कसे मुलांनी शिकायचे आणि शाळा कशा चालवायच्या संस्थाचालकांनी काय करायचे.
निधी अभावी शाळा बंद पडत आहेत. शाळांच्या मंजुरीसाठी लाखो रूपये घेतले जात आहेत. शिक्षणबाह्य कामे शिक्षणांना दिली जात आहेत. तुम्ही एसआयआरसाठी नवीन भरती करा. त्या काळापुरती खूप जास्त बेरोजगार मुले आहेत. शिकलेली आहेत. तुम्ही शाळा बंद पाडून एसआयआरचे कामे देत आहेत. शिक्षणांना तुम्ही दारोदार फिरवत आहेत. काही शिक्षण आजारी आहेत. ते कधी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.