संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेबाबत सर्वात मोठी अपडेट, सीआयडीचा मोठा निर्णय, आता थेट…

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही, त्यामुळे आता सीआयडीकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेबाबत सर्वात मोठी अपडेट, सीआयडीचा मोठा निर्णय, आता थेट...
KRUSHNA ANDHALE
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 4:06 PM

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, या घटनेला आता 14 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळं राज्यभरात खळबळ उडाली होती. संतापाचं वातावरण होतं. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी त्यावेळी अनेक ठिकाणी  मोठ मोठी आंदोलन देखील झाली. अखेर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं. मात्र तरी देखील एक आरोपी अजूनही फरारच आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. या घटनेला 14 महिने उलटून गेले तरी अजूनही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.

दरम्यान कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी सीआयडीने आता मोठा निर्णय घेतला आहे. आरोपी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सीआयडीकडून बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला सीआयडीकडून एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं सीआयडीकडून जाहीर करण्यात आलं आहे. या प्रकरणातील  आरोपींना अटक करण्यात आलं आहे, मात्र अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. त्याबद्दल न्यायालयाकडून सीआयडीला विचारणार करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

धनंजय देशमुख यांचा आरोप 

दरम्यान काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले होते. कृष्णा आंधळे हा मध्यंतरी एकदा -दोनदा गावी येऊन गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात कृष्णा आंधळेचा कसून शोध घेतला जात आहे, मात्र तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे आता सीआयडीकडून त्याच्यावर एक लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं देखील सीआयडीने म्हटलं आहे. त्यामुळे आता तरी कृष्णा आंधळे पकडला जाणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us