महिला डॉक्टरने आधीच दिलेली आत्महत्येची कल्पना, वडिलांनीच केला खळबळजनक खुलासा

सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये तिने दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी त्रास दिला जात होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

महिला डॉक्टरने आधीच दिलेली आत्महत्येची कल्पना, वडिलांनीच केला खळबळजनक खुलासा
dr sampada munde father
| Updated on: Oct 24, 2025 | 4:50 PM

महाराष्ट्रातील सातारा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने केवळ फलटण उपजिल्हा रुग्णालयच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. महिला डॉक्टरने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहित दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. आता याप्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत.

महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता याप्रकरणी तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीला वारंवार पोस्टमोर्टम रिपोर्ट बदलून द्या, असे सांगितले जायचे. मला जर त्रास झाला तर आत्महत्या करेन, असे ती वारंवार सांगायची, असे तिचे वडील म्हणाले.

वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?

माझ्या मुलीने काल काहीही न सांगता अचानक आत्महत्या केली. आम्हाला काहीही न सांगता तिने ड्युटी संपल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. ती आम्हाला अधूनमधून सांगायची की मला पोस्टमोर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वैगरे असा अधिकाऱ्यांचा त्रास होतो. मला जर तसा त्रास झाला तर मी आत्महत्या करेन, असे ती अधूनमधून सांगायची. तिने याबद्दल लेखी तक्रार दिली होती. तिला अजून याचे उत्तर मिळालेले नाही. तिला पोस्टमोर्टम करताना जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून व्हायचा. या प्रकरणी रिपोर्ट बदलून द्या असं सांगितले जायचे, तिला ते सहन व्हायचं नाही म्हणून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने आजूबाजूच्या लोकांनाही मला जास्त त्रास व्हायला लागला तर मी सुसाईड करेन असे सांगितले. आम्हाला अजून बाकी त्यातलं काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया तिच्या वडीलांनी दिली आहे.

दरम्यान साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती.. PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. आता याप्रकरणी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.