Gunratna Sadavarte Video : गुणरत्न सदावर्तेंचं उदयनराजेंना आव्हान? आधी विरोधी वक्तव्य, आता थेट कॉलर उडवली

आज सातारकरांना आणि महाराष्ट्राला आणखी एक कॉलर उडवण्याची स्टाईल परिचित झालीय. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) चक्क पोलिसांच्या गराड्यातही कॉलर उडवताना दिसून आले.

Gunratna Sadavarte Video : गुणरत्न सदावर्तेंचं उदयनराजेंना आव्हान? आधी विरोधी वक्तव्य, आता थेट कॉलर उडवली
पोलिसांच्या ताब्यात असतानाही सदावर्तेंनी कॉलर उडवली!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:34 AM

सातारा : साताऱ्यातून आजपर्यंत कुणी कॉलर उडवल्याच्या चर्चा राहिल्या असतील आणि कॉलर उडवायची स्टाईल कुणाची फेमस असेल तर ती खासदार उदयनराजे भोसलेंची (Udyanraje Collar Style). मात्र आज सातारकरांना आणि महाराष्ट्राला आणखी एक कॉलर उडवण्याची स्टाईल परिचित झालीय. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) चक्क पोलिसांच्या गराड्यातही कॉलर उडवताना दिसून आले. आणि हे घडलंय सदावर्तेंची पोलीस कोठडी आणि कोर्टवारी या दरम्यान. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी आंदोलनाचा (St Worker Protest) मुद्दा पेटाला आहे. सुरूवातील या आंदोलनाचे नेतृत्व भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलं. मात्र सरकारने पगारवाढीबाबत मोठी घोषणा केली आणि आंदोलनाचे नेतृत्व बदललं. या आंदोलकांची बाजू कोर्टात गुणरत्न सदावर्ते मांडत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी चांगल्याच वाढवल्या.

पोलीस कोठडीनंतरही कॉलर उडवली

गुणरत्न सदावर्तेंवर मुंबईपासून जे गुन्हे दाखल व्हायची मालिका सुरू झाली ती अगदी बीड, सातारा, कोल्हापूर, पुणे अशी थांबेनाच झाली. मुंबईत चार दिवस पोलीस कोठडीत काढल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. मात्र तोपर्यंत सातारा पोलीस गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत पोहोचले होते. कारण गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दा तापला होता त्यावेळी खासदार उदयनराजे आणि संभाजीराजेंबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यात त्यांच्या आता गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर साताऱ्यातल्या कोर्टानेही गुणरत्न सादवर्तेंना चार दिवस कोठडीत पाठवलं.

सदावर्तेंचा इशारा नेमका कुणाला?

आज वकील सदावर्तेंची साताऱ्यातली पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र यावेळी सदावर्तेंनी थेट कॉलर उडवत पुन्हा इशारा केला. आता हा इशारा नेमका कुणाला होता? हे सदावर्तेंनाच माहिती. मात्र सदावर्तेंचा हा व्हिडिओ कॅमेऱ्याने बरोबर टीपला आणि या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे गेले आठ दिवस पोलीस कोठडीत असलेले सदावर्ते थेट पुन्हा कॉलर उडवताना दिसले.

त्यामुळे सोशल मीडियावरही हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. तसेच या व्हिडिओवर तशाच भन्नाट कमेंटही येत हाते. याला एका युजरने लिहले आहे की “सदावर्ते हा एकटा नाही लक्षात ठेवा. कॉलर उडवणे इतके सोपं नाही यांच्या मागे खूप मोठी शक्ती आहे” तर दुसऱ्या युजरने लिहले आहे, की “वारं माझ्या पठ्ठ्या,सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं.. सत्यमेव जयते, अशा दोन्ही बाजूने अनेक कमेंट या व्हिडिओवर येऊ लागल्या आहेत.

Gunratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणारे सदावर्ते स्वत:च्याच बिल्डिंगमध्ये मात्र बदनाम! गुंडगिरीची भाषा आणि वर्तणुकीमुळे रहिवासी त्रस्त

Sadhvi Rithambara : हिंदूराष्ट्रासाठी प्रत्येक हिंदुंनी 4 मुलं जन्माला घाला, 2 मुलं RSS, विश्व हिंदू परिषदला द्या, साध्वी ऋतंभरांचा अजब सल्ला

Khadse vs Mahajan : खडसे, महाजनांनी एकमेकांची लायकी काढली! महाजनांनी खरं सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही? खडसेंचा सवाल

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.