रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक, साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक, साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात
रामदास आठवले यांच्या वाहनाचा अपघात
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 7:05 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.

रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामदास आठवले सुखरुप आहेत ना? अपघाताची घटना नेमकी कशी झाली? रामदास आठवले आता कुठे आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. रामदास आठवले यांच्याकडून अद्याप तरी अधिकृतपणे अपघातानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कदाचित ते थोड्या वेळाने त्यांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देतील. पण ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. रामदास आठवले मुंबईत आल्यानंतर कदाचित माध्यांशी संवाद साधतील तेव्हा अपघाताबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात.

‘या’ लोकप्रतिनिधींच्या भीषण अपघाताने महाराष्ट्राची जनता हळहळलीय

लोकप्रतिनिधींच्या अपघाताची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील वाहनांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या काही अपघातांमध्ये चांगल्या आणि लोकप्रिय लोकप्रतिनिधींचा जीवही गेला आहे. त्यामुळे अपघाताचं नाव ऐकलं की नागरिकांच्या मनात धडकी भरते. याआधी आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची घटना घडली होती. त्यांची गाडी थेट 30 फुटावरुन खाली कोसळली होती. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

शिवसंग्राम संघटेनेचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांच्यादेखील गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांच्यासारख्या दिग्गज मराठा नेत्याचा अपघात झाला होता. विशेष म्हणडे विनायक मेटे यांच्याकडे चांगली महागडी कार होती. पण तरीदखील त्यांच्या अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली होती. या अपघातामुळे महाराष्ट्राने एका चांगल्या नेत्याला गमावलं होतं. या अपघातानंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.