
तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. आता या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी उडी घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थावर भेट घेतली आणि वृक्षच आपले आई – बाप असं म्हटलं आहे. सांगायचं झालं तर, शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आंदोलन केल होत. सयाजी शिंदे हेदेखील या वृक्षतोडीला विरोध करत असून त्यानीही आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सयाजी शिंदे यांनी माध्यमांसमोर स्वतःची भुमिका मांडली, ज्या जागेत झाडी आलीच नाहीत, तिथे 15 फुटी झाड लागणार कशी? तिथे मातीच तशी नसेल, ही झाड आहे तशीच राहिली पाहिजे… नवीन झाडांची फसवणूक झाली नाही पाहिजे, महाराष्ट्राची वनराई टिकली पाहिजे….मला झाडांशिवाय काही दुसर माहित नाही…
पुढे सयाजी शिंदे म्हणाले, ‘सरकार आपलं दुश्मन नाही. त्यांना आपली भुमिका समजली पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजे… राठ ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंब मिळाल्यानंतर सयाजी शिंदे म्हणाले, ‘झाडांसाठी येणारी सर्व आपलीच माणसं आहेत… त्यामुळे जेवढे येतील त्यांना सोबत घेऊन आपल्याला झाडे वाचवायची आहेत… तेच आपले आई – बाबा हेच आपलं म्हणणं आहे आणि तेच सत्य आहे…’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाम भुमिका घ्यावी… असं वाटत आहे का? यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘अजित पवार यांनी ठाम भुमिका घेतलीच आहे… त्यामुळे मला आनंद झाला. एवंढच नाही तर, सगळ्याच कलाकारांनी पुढे येऊन बोललं पाहिजे असं काहीही नाही. झाडे वाचली पाहिजे हेच सर्वांचं मत आहे. काही पर्यावरणवादी पाठींबा देत नसतील तर त्यांचा विचार करावा लागेल… पण झाडे तोडावीत असं कोणालाच वाटत नाही…’
यावर सयाजी शिंदे म्हणाले, ‘एक्सीबिशन सेंटर होऊ नये असे मला वाटतं आणि ते होणार देखली नाही, ते होणार असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटणार…’ गिरीश महाजन यांच्याबद्दल देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘गिरीश महाजनांनी असं नाही केलं पाहिजे. 15 फुटी झाड लावण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते… मंत्री पद लेव्हलला माणसाला जर हे कळत नसेल तर कसं व्हायचं? झाड तोडून काही मिळणार नाही… ते झुडप असो वा वेली असो त्यावरच आपण जगतो…
राज ठाकरे यांच्याबद्दल सयाजी शिंदे म्हणाले, ‘राज ठाकरे माणूस म्हणून मला खूप आवडतात, अनेकदा भेटी झाल्यात, आता मिडिया समोर भेट झाली. सरकार आपलं आहे, आपण त्यांचे आहोत, सगळ्यांनी झाड लावली पाहिजे…
नाम फाउंडेशन का पुढे नाही? असा प्रश्न सयाजी शिंदे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, नाना पाटेकर काल नाटकाला आले होते, त्यांनी सांगितलं झाड वाचली पाहिजे, सगळ्यांनी मिडियासमोर आली पाहिजे असं नाही… आपण सगळे मिळून झाड लावू, सगळ्यांनी झाड वाचवू…