Sayaji Shinde: झाडं नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का? वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे संतापले; राज्य सरकारला थेट सवाल

Karjat Tree Felling Row: कर्जतमधील वृक्षतोडीच्या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

Sayaji Shinde: झाडं नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का? वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे संतापले; राज्य सरकारला थेट सवाल
| Updated on: Oct 26, 2026 | 4:39 PM

कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. यावर अनेक जणांना विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी आता राज्य सरकारला घेरलं आहे. आज आदित्य ठाकरे वृक्षतोडीच्या पाहणीसाठी कर्जतमध्ये पोहोचले होते. तर दुसरीकडे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीवर मोठा विरोध दर्शवला होता. यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सयाजी शिंदेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच एक सवाल केला आहे.

यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, पॉलिटिकल प्रेशरमुळे जीआर काढून राखीव किती तरी हजार एकर जमीन घेतली जात आहे. नंतर सगळं संपवलं जात आहे. जुन्या झाडांना हात न लावता विकास करता आला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे ही लोकशाही आहे. हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का? मग तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका. आम्हाला फसवू नका, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Loading...

ते म्हणाले की, धाराशिवमध्ये १० लाख झाडे लावली आहेत. १० वर्षांनी बघायची कशी जगली आहेत ती. त्याला खर्च किती जातो, हे पाहिलं जात नाही. आहेत ती मोठी झाडे तोडू नका. लोकशाही आहे की नाही आहे? आता आम्ही एक सेव्ह सह्याद्री नावाने एक मोहीम सुरू केली आहे. त्यात अनेक लोक तयार झाली आहेत. त्यातील काही तज्ञ मंडळी घेऊन सरकारकडे जाणार. असे प्रोजेक्ट महाराष्ट्रात का नको, हे मांडणार.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us