नांदेडमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू , 6 गंभीर जखमी

नांदेडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, नांदेड - नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओचा मोठा अपघात झला आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेडमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू , 6 गंभीर जखमी
प्रतिकात्मक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 9:28 PM

नांदेडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, नांदेड – नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीपचा मोठा अपघात झला आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की जागेवरच दोघांचा मृत्यू झाला, सय्यद हुसेन (वय 32 वर्षे ) व शेख सलाम ( वय 30 वर्षे ) दोघे ही राहणार पाकीजा नगर नांदेड असं या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नांदेड – नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीपचा मोठा अपघात झला आहे. अर्धापूर कडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीने डिव्हायडर ओलांडून ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. सय्यद हुसेन (वय 32 वर्षे ) व शेख सलाम ( वय 30 वर्षे ) दोघे ही राहणार पाकीजा नगर नांदेड अशी मृतांची नावं आहेत. तर सहा जण या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. नांदेडपासून जवळच असलेल्या पिंपळगाव पाटील जवळ हा अपघात झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र स्कॉर्पिओ चालकांचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भरधाव स्कॉर्पिओने डिव्हायडर ओलांडून ट्रकला धडक धडक दिली. प्रचंड भीषण असा हा अपघात होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाहनांचं नुकसान

या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे, नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.