कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन, जयप्रकाश छाजेड कसे झाले होते आमदार?
नागपूर येथे पक्षाच्या बैठकीला जाण्याच्या तयारीत असलेल्या जयप्रकाश छाजेड यांना हृदय विकाराचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : कधीकाळी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे जयप्रकाश छाजेड यांचे मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. जयप्रकाश छाजेड हे कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. याशिवाय आमदार म्हणूनही ते विधानपरिषदेवर गेले होते त्यानंतर त्यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कामही पाहत होते. 75 वर्षीय असलेले जयप्रकाश छाजेड यांची प्रकृती अचानक बिघडली होती. नागपूर येथे पक्षाच्या बैठकीसाठी जाण्याच्या तयारीत असतांना कुटुंबातील व्यक्तीने काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. काही वेळ उलटत नाही तोच जयप्रकाश छाजेड यांच्या छातीत त्रास होऊ लागला. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, त्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेस पक्षाशी त्यांचे कुटुंब एकनिष्ठ राहिले आहे. विलासराव देशमुख यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असल्याने त्यांना विधान परिषद सदस्य पद देण्यात आले होते. कॉंग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत जयप्रकाश छाजेड यांचा मोठा सहभाग होता.
नागपूर येथे पक्षाच्या बैठकीला जाण्याच्या तयारीत असलेल्या जयप्रकाश छाजेड यांना हृदय विकाराचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
ही माहिती कॉंग्रेसच्या नेत्यांना कळाल्याने नागपूर येथे पोहचलेले पदाधिकारी हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहे, दरम्यान जयप्रकाश छाजेड यांचे पार्थिक कॉंग्रेस कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
जयप्रकाश छाजेड यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती, कॉंग्रेसच्या जुन्या नेत्यांपैकी एक असलेले जयप्रकाश छाजेड सर्वांना परिचित होते.
इंटकच्या माध्यमातून त्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते, नुकताच झालेल्या एसटीच्या संपात त्यांनी सत्तेत असतांना कामगारांची बाजू मांडली होती.
कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले जयप्रकाश छाजेड यांचा मोठा लौकिक होता, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील व्यक्ति म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते.
त्यांच्या पत्नी शोभा छाजेड या देखील उपमहापौर राहिल्या आहे. त्यांना प्रीतेश आणि आकाश अशी दोन मुलं आहेत, सायंकाळी सहा वाजता जयप्रकाश छाजेड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
