सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेाणार आहेत. यावर आता शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..
Sharad Pawar
| Updated on: Jan 31, 2026 | 9:04 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली जात होती आणि तशा घडामोडींना वेगही आला. आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाची 2 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या 5 वाजता शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवारला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू आहे आणि याकरिता भाजपा देखील सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला काही तास झालेले असतानाच उपमुख्यमंत्रीपदावरून हालचाली वाढताना दिसत आहेत. रात्री उशीरा मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या.

यादरम्यानच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना शरद पवार दिसले.

पटेल, तटकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तो त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांचे निधन हा राज्यासाठी मोठा आघात आहे. NCP ने काय करावे, हे त्यांच्या पक्षातील नेते ठरवतील. भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. विलिनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. पण आता खंड पडला.

त्यांच्या पक्षाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे, असेही शरद पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणीतीही चर्चा न करता मुलगा पार्थ पवार याच्यासोबत सुनेत्रा पवार रात्री उशिरा मुंबईत आल्या, शिवाय त्यांनी कोणतीही चर्चा शरद पवार यांच्यासोबत केली नाही, हे शरद पवार यांनी स्वत: सांगितले. यावरून आता विविध चर्चांना उधाण आलंय.