पवारांनी क्लियर करताच पुण्यात महत्त्वाचा निर्णय, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत..काँग्रेसनंतर पवार गटानेही डाव टाकला, काय घडतंय?

पक्षाने पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेही या शहरात स्वत:चा विस्तार करण्यासाठी कंबर कसलेली आहे. इकडे भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान आहे. त्यामुळे आता आगामी काळात या पक्षाची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पवारांनी क्लियर करताच पुण्यात महत्त्वाचा निर्णय, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत..काँग्रेसनंतर पवार गटानेही डाव टाकला, काय घडतंय?
sharad pawar ncp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 10:23 PM

NCP Sharad Pawar Pune : पुणे हे शहर राज्यात अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्र असो किंवा राजकारण या शहरात काही घडलं की त्याची राज्यभर चर्चा होते. म्हणूनच या शहरात आपली ताकद वाढावी यासाठी प्रत्येक पक्ष काम करतो. त्यासाठी पक्षांतर्गत बदल असो, नव्या नियुक्त्या असो किंवा अन्य पक्षांतर्गत निर्णय असो, सगळेच पक्ष या प्रत्येक निर्णयाकडे गांभीर्याने पाहतात. शरद पवार यांच्या पक्षानेही पुण्यात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या शहरासाठी पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन शहराध्यक्ष दिले आहेत. याच शहरात काँग्रेसलाही दोन शहराध्यक्ष आहेत.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही दोन शहराध्यक्ष देण्यात आले आहेत. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीनेही दोन शहराध्यक्षांची निवड केली आहे. पुणे पूर्व शहराध्यक्षपदी श्रीकांत पाटील तर पश्चिम शहराध्यक्षपदी विशाल तांबे यांची निवड करण्यात आली आहे. पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठक झाल्यानंतर पुणे शहरासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे.

पवारांनी सांगितलं आणि पक्ष कामाला लागला

गेल्या काही दिवसांपासून पवार यांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएत सामील होणार आहे, असे सांगितले जात होते. पडद्यामागे त्यासाठी हालचाली केल्या जात आहेत, असेही सांगितले जात होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर नेमका काय आणि कधी निर्णय होणार? याकडे स्थानिक पातळीवर लक्ष लागले होते. परंतु पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण विरोधात आहोत. कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा दिला सल्ला दिला. त्यानंतर आता पुणे शहरात पवार गटाने काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमले आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेही या शहरात स्वत:चा विस्तार करण्यासाठी कंबर कसलेली आहे. इकडे भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान आहे. त्यामुळे आता आगामी काळात या पक्षाची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us