Sharad Pawar NCP : शिंदे-फडणवीस वादात सुपरबॉस कोण? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एकावाक्यात उत्तर

शरद पवार राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,हर्षवर्धन पाटील,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड,सुप्रिया सुळे,निलेश लंके,अमोल कोल्हे हे नेतेमंडळी उपस्थित झाली आहेत

Sharad Pawar NCP : शिंदे-फडणवीस वादात सुपरबॉस कोण? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एकावाक्यात उत्तर
Shinde-Fadnavis
| Updated on: Aug 29, 2026 | 11:05 AM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज कोर कमिटीची बैठक होत आहे. वाय बी चव्हाण सेंटर मध्ये ही बैठक पार पडणार आहे. आजच्या कोर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवार गैरहजर असतील. गैरहजेरीचं कारण आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्राद्वारे पक्षाला कळवलं आहे. या बैठकीला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पक्ष संघटना वाढीबाबत आणि करण्यात येणाऱ्या बदलाबाबत बैठक आहे. विलीनीकरणाची चर्चा बैठकीत होणार नाही. अनेक लोकांना संधी देण्याबाबत आजची बैठक आहे. ऑक्टोबर नंतर राज्यात दौरे करण्याबाबत बैठक आहे” असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर म्हणाले की, “त्यांना नियमात दाखले देण्याबाबत सरकारने आश्वासन दिलं होतं. चार मंत्री त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. सरकारच्या वतीने त्यांनी भूमिका स्पष्ट करावी” आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ते म्हणाले की, “नागपूर आणि सगळीकडेच वसतिगृहात उपोषण करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. एक मागणी मान्य झाली आहे. बाकीचे मुद्दे तसेच आहेत. आदिवासी विकास मंत्री गंभीर नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. त्यातून मार्ग निघाला पाहिजे. एवढा निधी असताना अशी गैरसोय का होतेय?”

मुख्यमंत्री सुपर बॉस

“बोगस भरती करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्या रॅकेटचा पर्दाफाश होत नाही, तोपर्यंत खऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही. मंत्र्यांचे नातेवाईक घोटाळ्यात आढळून आले आहेत” असं शशिकांत शिंदे म्हणाले. शिंदे-फडणवीस वादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सुपर बॉस आहेत हे त्यांनी हे दाखवून दिलं आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले.

SIR ची मूळ प्रत भाजप कार्यकर्त्यांकडे आली कशी?

खारघरमध्ये झेरॉक्स दुकानात SIR चे फॉर्म सापडले. त्यावर ते म्हणाले की, “आमची निवडणूक आयोगावर हीच शंका आहे. आम्ही त्यांच्या कामावर विश्वास ठेऊन आहोत. SIR ची मूळ प्रत भाजप कार्यकर्त्यांकडे आली कशी?. यातून मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत गडबड करण्याची शंका आहे”

 

Follow Us