Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितलं त्यांच्या स्मरणशक्तींचं गुपित.. म्हणाले या दोन माणसांकडून हे शिकलो..

त्यांच्या स्मरणशक्तिबाबत य्यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, आता खरं सांगयाचं तर, दोन लोकांकडून मी अतिशय लहान वयात काम करण्याची संधी घेतली. त्यातल्या एकांचं नाव यशवंतराव चव्हाण आणि दुसऱ्यांचं नाव वसंतदादा पाटील.

Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितलं त्यांच्या स्मरणशक्तींचं गुपित.. म्हणाले या दोन माणसांकडून हे शिकलो..
शरद पवारांनी सांगितलं त्यांच्या स्मरणशक्तींचं गुपित.. म्हणाले या दोन मामसांकडून हे शिकलो..
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 04, 2022 | 6:56 PM

पुणे : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) एकाच कार्यक्रमात दिसून आले. यावेळी संजय राऊतांनी मंचावरून भाजपला इशारा दिला. तर दुसरीकडे शरद पवारांनी त्यांच्या स्मरणशक्तिचं गुपीत (Memory) सांगितलं आहे. यावेळी पवारांना त्यांच्या वयाबाबत आणि धावपळीबाबतही विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी आज पुण्यात सविस्तर उत्तरं दिली आहेत. त्यांच्या स्मरणशक्तिबाबत य्यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, आता खरं सांगयाचं तर, दोन लोकांकडून मी अतिशय लहान वयात काम करण्याची संधी घेतली. त्यातल्या एकांचं नाव यशवंतराव चव्हाण आणि दुसऱ्यांचं नाव वसंतदादा पाटील. या दोन लोकांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांचा कुणीही, अगीद पन्नास वर्षापूर्वीचा त्यांचा जोडीदार जरी त्यांना भेटायला आला. तर त्याला पहिल्या नवाने हाक मारायचे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा यांच्याकडून शिकलो

यशवंतराव आणि वसंतदादा यांच्याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले. त्यांचं राजकारण मोठं व्हायला अनेक गोष्टी आहेत. मात्र पहिलं नावं घेऊन सुसंवाद ठेवल्याने त्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळायचा. त्यावर माझं लक्ष असायचं. आता साधं एक उदाहर सांगतो, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्या मतदार संघातील एक भगिनी काही कामासाठी आली. ती आल्यानंतर तिला बस म्हणलं. आणि काय कुसूम काय चालंय. तेव्हा काय कसूम म्हणल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आणि त्या आनंदात काय काम होतं तेचं ती विसरली. त्यानंतर ती गावात जाऊन सांगायला लागली. माझं काम होऊ किंवा न होऊ, मात्र साहेबांनी मला कुसूम म्हणून हाक मारली. तर लोकांना व्यक्तिगत संबंध, नावं जर आपण लक्षात ठेवली. तर त्याचा प्रचंड फायदा होतो, असे उदाहरणही यावेळी पवारांनी दिलं.

आता जनरेशन गॅप आला

तर एकेकाळी माझा मतदारसंघ असा होता की पन्नास टक्के लोकांना मी पहिल्या नावाने ओळखायचो. आता फरत पडला आता जनरेशन गॅप आला. आता आल्यानंतर विचारतो तुझ्या वडिलांचं नाव काय? तेव्हा कळतं कोणत्या घरातला आहे. ती पद्धत आता माझी वाढत्या वयामुळे झाली, असे उत्तर यावेळी पवारांनी दिलं. तसेच सतत लोकांमध्ये राहिलं, लोकांची काम केली. तर आपल्याला थकवा येत नाही. या देशातला कष्टकरी माणूस तुम्हाला कसल्याही संकटावर मात करून पुढे जाण्याची उर्जा देतो. असेही पवार म्हणाले. पवार आणि राऊतांची ही पुण्यातली मुलाखत चांगलीच गाजली आहे.