पवारांचं मोदींच्या पावलावर पाऊल, कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई : हायटेक प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवलंय. शरद पवार एकाचवेळी 10 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदीही गेल्या काही महिन्यांपासून भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपप्रमाणे हायटेक प्रचाराची सुरुवात केली आहे. या …

पवारांचं मोदींच्या पावलावर पाऊल, कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई : हायटेक प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवलंय. शरद पवार एकाचवेळी 10 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदीही गेल्या काही महिन्यांपासून भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपप्रमाणे हायटेक प्रचाराची सुरुवात केली आहे.

या संवादामध्ये शरद पवार बूथ प्रमुखांशी संपर्क साधतील. दहा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडील औरंगाबाद मतदारसंघाचाही समावेश आहे. कोल्हापूर, सातारा, ईशान्य मुंबई, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, रावेर, जळगाव या महासंघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ काँग्रेसने अजून राष्ट्रवादीसाठी सोडलेला नाही. तरीही औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हवाय, तर काँग्रेसला राष्ट्रवादीकडे असलेला नगर दक्षिण मतदारसंघ हवाय. पण नगरची जागा सोडण्यासाठी राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिलाय. तर काँग्रेसनेही अजून औरंगाबादची जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. तरीही राष्ट्रवादीने औरंगाबादमध्ये तयारी सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन यात्राही काढण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या सभा यानिमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये झाल्या. पण शरद पवार प्रत्येक सभेला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करण्याचा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेसने निवडलाय.

भाजपकडून 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून हायटेक प्रचाराचा मार्ग अवलंबण्यात आला. मोदींना देशातील प्रत्येक मतदारसंघात जाणं शक्य होत नाही, पण देशातल्या सर्व भागातील मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत असतात. यामध्ये कार्यकर्तेही त्यांच्या मनातले प्रश्न विचारतात. हाच प्रचाराचा मार्ग आता शरद पवार अवलंबणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *