48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शरद पवारांवर ही टीका कुणी केली ?

| Updated on: Dec 07, 2022 | 4:57 PM

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याविषयी बोलत असतांना शिंदे गटाच्या नेत्याने शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे.

48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शरद पवारांवर ही टीका कुणी केली ?
Image Credit source: Google
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे : बेळगाव प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतांना आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे, अन्यथा मी कर्नाटकात जाईल असा इशारा दिला आहे. याशिवाय संजय राऊतही कर्नाटक सरकारसह राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. 48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं ? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे असं शरद पवार यांच्या भूमिकेवर बोलतांना विजय शिवतारे यांनी म्हंटले आहे. तर संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याविषयी बोलत असतांना शिंदे गटाच्या नेत्याने शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

विजय शिवतारे हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत त्यांची भूमिका म्हणजे राजकारण असल्याचा आरोपही केला आहे.

विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्याविषयी बोलत असतांना राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज असल्याची टीकाही केली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद उफाळून आलेला असतांना शिंदे गटाच्या शिवतारे यांनी पलटवार केला आहे. त्याची ही टीका आक्रमक असली तरी त्यावर महाविकास आघाडी काय प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार यांच्यावर आरोप करत असतांना शिवतारे यांना आपण चार वेळा मुख्यमंत्री असतांना काय केले असा टोलाही लगावला आहे.