AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती, या महापालिकेत एकत्र लढणार

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांत अनपेक्षित युतींनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत केलेली हातमिळवणी चर्चेत असतानाच, आता शिंदे गट आणि अजित पवार गटानेही एमआयएमशी युती केली आहे. परळी नगरपालिकेत गटनेता निवडीसाठी हे नवे समीकरण उदयास आले असून, त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती, या महापालिकेत एकत्र लढणार
शिंदे गट, अजित पवार गटाचे भाजपच्याच पावलावर पाऊलImage Credit source: social media
| Updated on: Jan 09, 2026 | 10:03 AM
Share

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात एका संभाव्य युतीने मोठा स्फोट झाला होता. अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती तर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) शी युती केली होती. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. भाजप हा काँग्रेस आणि एमआयएम सोबत जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आल्यावर मोठा गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून नाराजी व्यक्त करत हे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितलं. तर काँग्रेसतर्फेही या युतीला नकार देत हे पाऊल उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असा इशारा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिला.

या सर्व प्रकरणावरून राज्यातील तापलेलं वातावरण अजून शांत झालेलं नसतानाच आता महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेले त्यांचे मित्रपक्ष म्हणजेज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गय, यांनीही भाजपच्या पावलावर पाऊल टाकल्याचं दिसत आहे. भाजपनंतर शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा मोठी खळबळ माजली आहे.

परळीत दिसतायत नवी समीकरणं !

परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर आता नवीन समीकरणं पहायला मिळत आहेत. त्याचं कारण म्हणजे अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) शी गटनेता निवडीत युती केली आहे. खरंतर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे, पण आता या निर्णयाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

परळी नगरपरिषद निवड बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मित्रपक्ष, अपक्ष – 2 अशा 24 जणांचा समावेश आहे. तसेच या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश आहे. उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

ज्यांनी आरोप केले त्यांचाच गटात समावेश ?

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमच्या उमेदवार शेख आयेशा मोसीन यांच्या प्रचारार्थ एम आय एम चे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी सभा घेतली. या सभेत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी करण्यात आली. त्यानंतर त्या प्रभागात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. मात्र, एमआयएमचे हेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.