AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आधीच नाराज असलेल्या शिंदे गटाला भाजपचा आणखी एक मोठा धक्का, मंत्र्यांचा संताप

भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे, त्याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून सध्या शिवसेना शिंदे गटात नाराजी दिसून येत आहे, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! आधीच नाराज असलेल्या शिंदे गटाला भाजपचा आणखी एक मोठा धक्का, मंत्र्यांचा संताप
महायुती Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2025 | 6:17 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे टाला बसला असून, शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे, दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्र. १ मधील मयूरी चव्हाण व वॉर्ड क्र. १३ मधील रेशंता सोनवणे या दोन महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपत प्रवेश केला आहे.

शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने, दुसरीकडे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घ्यायला लावून, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुकाप्रमुखांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात एकीकडे नेते व पदाधिकारी पळवापळवीवरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये  राजकारण तापले असतानाच आता जळगावच्या जामनेरात भाजपने सहकारी पक्षाचे उमेदवार आपल्या गळाला लावले आहेत, त्यामुळे भाजपचे  दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

जळगावच्या जामनेर येथे नगरपालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवाराच्या  भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नये, असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेलं असताना देखील असे प्रवेश होत असतील तर ते चुकीचं आहे,  असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत पवार यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने दडपशाही करून, प्रलोभने देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली, त्यानंतर त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला.  भाजपने आमचे उमेदवार आणि पदाधिकारी चोरले, त्यामुळे जाहिर निषेध करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...