हिंगोलीमध्ये मोठा उलटफेर, भाजपच्या अडचणी वाढल्या, मोठी बातमी समोर
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक ऐन रंगात आली असताना भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे, येत्या 2 डिसेंबरला राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघा एक दिवस बाकी आहे, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस बाकी असतानाच भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. हिंगोलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोलीमधील भाजपच्या उमेदवारानं अचानक माघार घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, हा धक्का ताजा असतानाच आता हिंगोली नगर परिषदेत नगरसेवक पदासाठी भाजपच्या वतीनं अर्ज दाखल केलेल्या आणखी एका उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हिंगोलीमध्ये भाजपला दुसरा धक्का बसला आहे, भाजपाचे उमेदवार विजय काळे यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे. वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान विजय काळे यांच्यापूर्वी भाजपचे उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली होती, त्यांनी ऐनवेळेस शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. भाजपला या निवडणुकीत दोन धक्के बसले आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
तर दुसरीकडे पुन्हा एकदा महायुतीमधील धूसफूस समोर आली आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सूरू आहे, मात्र याचा फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये बुधवारी जवळपास 50 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या निवडणुकीनंतर लवकरच राज्यात महापालिका निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे.
