AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shambhuraj Desai : विनायक राऊत एकनाथ शिंदेंकडून रिचार्ज करुन घेतात, या बाळ मानेंच्या आरोपावर शंभूराज देसाईंनी दिलं उत्तर

Shambhuraj Desai : "त्याचा बाळ माने यांच्याशी काहीही संबंध नाही. आमच्या शिवसेनेबद्दल बाळ माने यांना कसं काय माहित?" "2022 साली 50 आमदार आणि आज 60 आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहोत. शिंदेसाहेब आमचे नेते आहेत"

Shambhuraj Desai : विनायक राऊत एकनाथ शिंदेंकडून रिचार्ज करुन घेतात, या बाळ मानेंच्या आरोपावर शंभूराज देसाईंनी दिलं उत्तर
Shambhuraj Desai
| Updated on: Jun 05, 2026 | 12:14 PM
Share

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून पैशांचं वाटप केलं जातय असं आरोप मविआकडून केला जातोय. संजय राऊतही तसं बोलले आहेत. यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईल बोलले आहेत. “पुरावा द्या, हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची मतं त्याचवेळी आमच्या बरोबर नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये स्थानिक आघाड्या आहेत. या सगळ्याची बेरीज पाहिली तर मविआचा टिकाव लागू शकत नाही. अर्ज भरायचा. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची निवडणूक होणार. महायुतीला जागा दाखवणार अशी मोठमोठी वक्तव्य करायची. मोठमोठे आकडे घेतात, पण त्यात काही तथ्य नाही” असं शंभूराज देसाई म्हणाले.

नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. त्यावर शभूंराज देसाई म्हणाले की, “दोन गीते बंधुंपैकी गणेश गीतेंनी उमेदवारी मागे घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने उदय सामंत, भाजपकडून गिरीश महाजन तिथे चर्चा करतायत. बैठका सुरु आहेत. काहीतरी तोडगा निघू शकेल”

आता बाळ माने वाईट झाले

बाळा माने यांनी विनायक राऊत यांच्यावर एकनाथ शिंदेंकडून रिचार्ज करुन घेतात असा आरोप केला. “बाळ माने यांनी अर्ज उबाठाकडून भरला होता. संजय राऊत काय म्हणत होते, बाळ माने आमचे उमेदवार आहेत. ते ताकदीने लढणार. कोकणात उबाठा प्रबळ आहे. महायुतीला जागा दाखवणार. जेव्हा संख्याबेरीज आपल्या बाजूने नाही हे बाळ माने यांच्या लक्षात आलं, टिकाव लागणार नाही हे त्यांना समजलं तेव्हा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागे घेतला” “आता बाळा माने वाईट झाले. संजय राऊत लगेच बोलायला लागले. विनायक राऊत रिचार्ज करुन घेतात हा विषय नाही. उबाठामध्ये असे अनेक जण आहेत, जे आतून एकनाथ शिंदे साहेबांना मानतात. काही तांत्रिक अडचण असल्यामुळे आम्ही इथे आहोत असं सांगतात. बाळ माने बोलले म्हणून बरं झालं. त्यांच्या-त्यांच्यातल्या गोष्टी बाहेर आल्या. महाराष्ट्रातील जनतेला कळेल उबाठामध्ये काय चाललय” असं शंभूराज देसाई म्हणाले.

शून्य टक्के तथ्य आहे

उदय सामंत उपमुख्यमंत्री पदाच्या संधीची वाट बघतायत असं बाळ माने बोलले. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले की, “त्याचा बाळ माने यांच्याशी काहीही संबंध नाही. आमच्या शिवसेनेबद्दल बाळ माने यांना कसं काय माहित?” “2022 साली 50 आमदार आणि आज 60 आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहोत. शिंदेसाहेब आमचे नेते आहेत.उदय सामंत यांच्याकडे शंकेने बघावं म्हणून ते असं बोलले. पण यात शून्य टक्के तथ्य आहे” असं शंभूराज देसाई म्हणाले.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा